Til Barfi Recipe: लोहरी असो किंवा मकर संक्रांत या दोन्ही सणाला तिळापासून बनवलेल्या वस्तूंना खूप महत्त्व असते. या दिवशी लोक तिळापासून बनवलेले विविद पदार्थ बनवून तोंड गोड करतात. जर तुम्हालाही तुमचा सणाचा गोडवा वाढवायचा असेल तर तुम्ही तिळाची बर्फी बनवू शकता. या काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही झटपट बर्फी बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या या संक्रांतसाठी तिळाची बर्फी कशी बनवायची.
- ३/४ कप तीळ
- १/२ कप साखर
- १ कप क्रीम
- १ कप मिल्क पावडर
- १/६ टीस्पून हिरवी वेलची पावडर
संक्रांतसाठी तिळाची बर्फी बनवण्यासाठी प्रथम तीळ मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. साधारण ५ मिनिटांनी कढईतून बाहेर काढा आणि बाजूला ठेवा. आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये हेवी क्रीम आणि मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करा. हे मध्यम ते हाय फ्लेमवर शिजवा. या मिश्रणात बुडबुडे दिसेपर्यंत सतत ढवळत राहा. आता गॅसची फ्लेम मध्यम करा आणि पॅनच्या बाजू आणि तळाशी सतत ढवळत राहा जोपर्यंत मिश्रण घट्ट पेस्टमध्ये बदलत नाही आणि एकत्र येण्यास सुरुवात होत नाही. लक्षात ठेवा की हे होण्यासाठी किमान १० मिनिटे लागतील. आता या पेस्टमध्ये भाजलेले तीळ घाला आणि चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण मऊ पिठासारखे होईपर्यंत ढवळत राहा. त्यानंतर गॅस कमी करून त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. साखर घातल्याने मिश्रण मऊ होईल.
यानंतर तयार झालेले बर्फीचे मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये किमान एक इंच जाडीच्या थरात पसरवा. आता हे रुम टेम्परेचरवर २ ताससाठी बाजूला ठेवा. आता बर्फीला हव्या त्या आकारात कापून घ्या. तुमची तिळाची बर्फी तयार आहे.