मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: घट्ट दही बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

Kitchen Tips: घट्ट दही बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 26, 2024 05:41 PM IST

Health Benefits of Eating Curd: दही खाणे हाडांसाठीही चांगले मानले जाते. याशिवाय उन्हाळ्यात दही आवर्जून खावे. याचे अनेक फायदे मिळतील.

how to make thick curd
how to make thick curd (freepik)

Health Benefits of Curd: उन्हाळा सुरु झाला कि आवर्जून दही खाल्ले जाते. दही पोटाला शांतता देतात. दही असेच खाल्ले जाते किंवा कोशिंबीर किंवा रेसिपीमध्ये वापरले जातात. दही हे भारतीय घरातील मुख्य अन्न आहे. हे अन्नाची चव तर वाढवतेच, पण त्याचबरोबर आरोग्यासाठी भरपूर फायदेही देते. दही जास्त करून बाहेरूनच आणले जाते. घरी बनवणे अनेकांना अवघड वाटते. घरी दही बनवणे खूप सोपे आहे, कारण तुम्हाला फक्त एक चमचा दही आणि एक ग्लास दूध आवश्यक आहे. अशा अतिशय सोप्या टिप्स सांगणार आहेत, ज्या तुम्हाला घरी मलईदार दही बनवण्यास मदत करतील.

या टिप्स फॉलो करा

> घट्ट आणि मलईदार दह्यासाठी फुल क्रीम दूध वापरा.

> सर्वात आधी दूध छान गरम करून घ्या.

> थोडा वेळ थंड होण्यासाठी सोडा, नंतर त्यात दूध पावडर घाला.

> आता त्यात दुधाची पावडर नीट मिसळा आणि काही तास ठेवा.

> उबदार ठिकाणी ठेवा. यामुळे दही मलईदार आणि घट्ट होईल.

Drinking Tea in the Morning: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या

दही खाण्याचे फायदे

> दही खाणे हाडांसाठीही चांगले मानले जाते. कारण यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे दही हाडे आतून मजबूत होतात.

> हळद मिसळून दही खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढतो. यामुळे फॅट्स बर्न होणे सोपे होते.

> फक्त आरोग्यच नाही तर तुमच्या स्किनसाठी दही खूप फायदेशीर आहे.

Kitchen Tips: जळलेली कढई साफ करण्याचे रहस्य जाणून घ्या, फॉलो करा या टिप्स!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel