मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tomato Chutney: जेवणाची चव द्विगुणीत करेल ही टोमॅटोची चटणी, नोट करा सोपी रेसिपी

Tomato Chutney: जेवणाची चव द्विगुणीत करेल ही टोमॅटोची चटणी, नोट करा सोपी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 04, 2024 12:13 PM IST

Chutney Recipe: ऋतु कोणताही असो टोमॅटो चटणी तुमच्या चवीची आणि आरोग्याची काळजी घेते. या भाजलेल्या टोमॅटो चटणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बनवायला जास्त वेळ लागत नाही. जाणून घ्या रेसिपी

टोमॅटोची चटणी
टोमॅटोची चटणी

Tomato Chutney Recipe: जेवणाच्या ताटात चटणीला वेगळे स्थान असते. यामुळेच भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारची चटणी पाहायला आणि खायला मिळतात. तसं तर ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या चाखल्या जातात. उन्हाळ्यात लोकांना पुदिना आणि कच्च्या कैरीची चटणी स्वादिष्ट वाटते, तर हिवाळ्यात मुळा, पेरू यांसारख्या चटण्या लोकांची चव सुधारतात. पण टोमॅटोची चटणी प्रत्येक ऋतूत तुमच्या चवीची आणि आरोग्याची काळजी घेते. या भाजलेल्या टोमॅटो चटणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बनवायला जास्त वेळ लागत नाही. चला तर मग जाणून घ्या ही टेस्टी टोमॅटोची चटणी कशी बनवायची.

टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी साहित्य

- २-३ मोठे टोमॅटो

- १ मध्यम कांदा चिरलेला

- २-३ हिरव्या मिरच्या

- ४-५ पाकळ्या लसूण

- कोथिंबीर

- १ टेबलस्पून लिंबाचा रस

- १ चमचा लाल तिखट

- २ चमचे मोहरीचे तेल

- चवीनुसार मीठ

टोमॅटोची चटणी बनवण्याची पद्धत

टेस्टी टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी प्रथम टोमॅटोचे दोन भाग करा. यानंतर कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात टोमॅटो, लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची घालून मंद आचेवर भाजून घ्या. हे सर्व नीट शिजू द्या. टोमॅटो झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर टोमॅटोची साल काढून टाकावी. कढईत थोडे तेल आणि लाल तिखट घालून शिजवा. आता टोमॅटो, लसूण आणि मिरची एका भांड्यात मीठ घालून बारीक वाटून घ्या. आता त्यात चिरलेला कांदा, ताजी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. सर्व काही नीट मिक्स करा. तुमची टेस्टी टोमॅटोची चटणी तयार आहे.

WhatsApp channel