Tandoori Paneer Tikka Recipe: जर तुम्हाला पनीर लव्हर असाल आणि तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारे खायला आवडत असेल तर तुम्हाला तंदूरी पनीर टिक्काची ही रेसिपी नक्कीच आवडेल. संध्याकाळच्या स्नॅकपासून ते पार्टी स्टार्टरपर्यंत या रेसिपीची चव लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडते. साधारणपणे तंदूरीची रेसिपी बनवण्यासाठी ओव्हनचा वापर केला जातो. पण या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ते बनवण्यासाठी ओव्हनची गरज नाही. घरगुती गॅस वापरून तुम्ही ते अगदी सहज बनवू शकता. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या तंदूरी पनीर टिक्काची रेसिपी.
- पनीरचे तुकडे
- २ चमचे भाजलेले बेसन
- १/२ कप हंग कर्ड
- २ चमचे फ्रेश क्रीम
- १ चमचा बटर वितळलेले
- भाज्या - कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो
- ३ चमचे आले लसूण पेस्ट
- १ चमचा हिरवी मिरची आणि कोथिंबीर
- १ चमचा ओवा
- १/२ चमचा जिरे पूड
- ३ चमचे लाल तिखट
- १ चमचा गरम मसाला
- १ चमचा चाट मसाला
- १/२ चमचा काळे मीठ
- ३ चमचे मोहरीचे तेल
- मीठ चवीनुसार
सर्वप्रथम एका बाउलमध्ये मोहरीचे तेल, लाल तिखट, बेसन, अर्धी वाटी दही, लसूण आले पेस्ट, ओवा, हिरवी मिरची, जिरे, गरम मसाला, चाट मसाला, काळे मीठ, चिरलेली कोथिंबीर, मीठ, चिरलेल्या भाज्या आणि पनीरचे तुकडे घालून सर्व काही चांगले मिक्स करा. आता ग्रीलला तेल लावून पनीर टिक्का थेट गॅसवर शिजवा. यानंतर पनीर एका भांड्यात ठेवा. त्यात थोडे चिरलेले कांदे, २ चमचे फ्रेश क्रीम, १ चमचा वितळलेले बटर, चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. तुमचे टेस्टी तंदूरी पनीर टिक्का सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.