Stuffed Parwal Bhaji or Sabji Recipe: स्टफ्ड भाजी खूप चवदार लागते. रोज तीच परवळची भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी दुपारच्या जेवणासाठी चविष्ट चटपटीत स्टफ्ड परवळ बनवा. त्याची रेसिपी सोपी आहे आणि ती बनवण्यासाठी वेगळे काहीही तयारी करण्याची गरज नाही. ही भाजी मोठ्यांप्रमाणेच लहान मुले सुद्धा आवडीने खातील. तुम्ही ही भाजी ड्राय खाऊ शकता किंवा तुम्हाला हवे असेल तर ग्रेव्हीमध्ये टाकून भाजी प्रमाणे बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या स्टफ्ड परवळची रेसिपी.
- २५० ग्रॅम परवळ
- एक चमचा मोहरीचे तेल
- अर्धा टीस्पून जिरे
- हिंग
- बेसन ३ चमचे
- बडीशेप पावडर दीड चमचा
- धनेपूड दीड चमचा
- हळद अर्धा टीस्पून
- काश्मिरी लाल तिखट
- जिरे पावडर अर्धा टीस्पून
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- आले अर्धा चमचा
- आमचूर पावडर
- गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
सर्वप्रथम परवळ चांगले धुवा. नंतर देठ कापून परवळचा वरचा पातळ थर खरवडून घ्या. आता परवळमध्ये लांब चीर द्या, जेणेकरून मसाला आत भरता येईल. तसेच परवळच्या बिया काढा. आता मसाला बनवण्यासाठी कढईत मोहरीचे तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंक घाला. तसेच तीन चमचे बेसन चांगले भाजून घ्यावे. बेसन भाजून झाल्यावर त्यात परवळच्या मधल्या भागाचा गर घालून भाजून घ्या. नीट भाजून झाल्यावर त्यात दीड टीस्पून बडीशेप पावडर, धने पूड, अर्धा टीस्पून हळद, काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून जिरे पूड घालून मिक्स करा. तसेच हिरवी मिरची, आले बारीक चिरून घाला. नंतर त्यात गरम मसाला, आमचूर पावडर घालून मिक्स करा. हा मसाला एका प्लेटमध्ये काढून त्यात मीठ घालून मिक्स करा. तयार केलेला मसाला सर्व परवळमध्ये चमच्याने दाबून भरा.
आता कढईत तेल घाला आणि ते गरम झाले की सर्व परवळ घालून चांगले शिजवा. झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी परवळ शिजेपर्यंत नीट शिजवा. तुमचे स्टफ्ड परवळ तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे असेच कोरडे खाऊ शकता किंवा ग्रेव्हीमध्ये घालून त्याची भाजी म्हणून खाता येते.
संबंधित बातम्या