मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ram Ladoo: हिवाळ्यात टेस्टी लागतात चटपटीत राम लाडू, नोट करा ही स्ट्रीट स्टाईल रेसिपी

Ram Ladoo: हिवाळ्यात टेस्टी लागतात चटपटीत राम लाडू, नोट करा ही स्ट्रीट स्टाईल रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 27, 2024 07:38 PM IST

Snacks Recipe: संध्याकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. तुम्हाला सुद्धा काही वेगळे ट्राय करायचे असेल तर तुम्ही राम लाडू बनवू शकता. स्ट्रीट स्टाईल रेसिपी जाणून घ्या.

राम लाडू
राम लाडू

Street Style Ram Ladoo Recipe: हिवाळ्यात बऱ्याचदा चटपटीत खायची क्रेविंग होते. थंडीचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही रोज संध्याकाळी स्ट्रीट फूड खायला जात असाल तर आता बाहेर जायची गरज नाही. स्ट्रीट स्टाईल फूड तुम्ही सहज घरी बनवू शकता. नेहमीच्या स्नॅक्सपेक्षा काहीतरी वेगळे खायचे असेल तर तुम्ही राम लाडूची ही स्ट्रीट स्टाईल रेसिपी ट्राय करू शकता. तुम्ही हे घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. जाणून घ्या याची रेसिपी.

राम लाडू बनवण्यासाठी साहित्य 

- २५० ग्रॅम मूग डाळ

- १०० ग्रॅम हरभरा डाळ

- किसलेला मुळा

- २ चमचे आले पेस्ट

- ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- १ चमचा चाट मसाला

- तळण्यासाठी तेल

- चवीनुसार मीठ

राम लाडू बनवण्याची पद्धत

राम लाडू बनवण्यासाठी प्रथम डाळ स्वच्छ करून सुमारे ८ तास पाण्यात भिजत ठेवा. डाळ भिजल्यानंतर ती बारीक वाटून घ्या. त्यात चाट मसाला, आल्याची पेस्ट, हिरवी मिरची, हिंग आणि मीठ टाका. आता हे १० ते १५ मिनिटे हाताने फेटत रहा. आता कढईत तेल गरम करून तयार मिश्रणातून हाताने एक एक करून गोल लाडू बनवा आणि तेलात टाका. हे मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. तळलेले राम लाडू हिरवी चटणी आणि मुळा सोबत सर्व्ह करा. तुम्ही यासोबत आंबट चटणी सुद्धा देऊ शकता.

WhatsApp channel