मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast मध्ये बनवा सोया व्हेजी पॅनकेक, वीकेंडची करा हेल्दी सुरुवात

Breakfast मध्ये बनवा सोया व्हेजी पॅनकेक, वीकेंडची करा हेल्दी सुरुवात

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 04, 2023 09:04 AM IST

Healthy Breakfast Recipe: जर घरातील लहान मुले आणि मोठ्यांना रोज सकाळी काही खास आणि चवदार नाश्ता हवा असेल तर सोया पॅनकेक बनवा. टेस्टी आणि हेल्दी असलेले हे पॅनकेकमध्ये भाज्या घालून ते अधिक स्वादिष्ट बनवता येते.

सोया व्हेजी पॅनकेक
सोया व्हेजी पॅनकेक

Soya Veggie Pancake Recipe: सकाळचा नाश्ता नेहमी हेल्दी आणि हेवी असावा. त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. हा नाश्ता मोठ्यांसोबत लहान मुलांसाठी देखील उत्तम आहे, जेणेकरून त्यांना लवकर भूक लागणार नाही आणि त्यांना अनावश्यक स्नॅकिंग करावे लागणार नाही. रोज तेच तेच पोहे आणि उपमा खाण्याचा कंटाळा आला आहे, तर झटपट व्हेजी पॅनकेक बनवा. ज्यामध्ये तुम्ही हेल्दी सोया टाकू शकता. यामुळे ते प्रथिनेआणि पौष्टिकतेने परिपूर्ण असतील आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतील. चला तर मग जाणून घेऊया सोया व्हेज पॅनकेक कसा बनवायचा.

सोया व्हेजी पॅनकेक बनवण्यासाठी साहित्य

- अर्धी वाटी भिजवलेले सोयाबीन

- १५० ग्रॅम भिजवलेले तांदूळ

- अर्धी वाटी दही

- ३ -४ हिरव्या मिरच्या

- आल्याचा एक इंच तुकडा

- १ सिमला मिरची बारीक चिरलेली

- १ टोमॅटो बारीक चिरलेला

- १ गाजर बारीक चिरलेला

- मीठ चवीनुसार

- अर्धा चमचा जिरे

- कोथिंबीर बारीक चिरलेली

- १/४ चमचा बेकिंग सोडा

सोया व्हेजी पॅनकेक बनवण्याची पद्धत

पॅनकेक बनवण्यासाठी प्रथम सोयावडी आणि तांदूळ धुवून वेगवेगळे भिजवावेत. तासभर भिजल्यावर ते फुगले की सोयावडी पिळून घ्या. नंतर ग्राइंडरच्या जार मध्ये टाकून बारीक करा. बारीक केलेली सोयावडी काढून प्लेटमध्ये ठेवा. नंतर या जार मध्ये भिजवलेले तांदूळ, अर्धी वाटी दही, २ हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा घालून बारीक करा. आता एका मोठ्या भांड्यात तांदळाची पेस्ट, सोयाबीन, अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, गाजर, टोमॅटो, मीठ, जिरे, कोथिंबीर टाका. सर्व साहित्य मिक्स करा आणि पाणी घालून फेटून घ्या. शेवटी बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

कसे बनवायचे पॅनकेक

पॅनवर थोडे तेल घाला आणि गरम करा. तेल गरम झाल्यावर तयार केलेले बॅटर टाका आणि पसरवा. झाकण ठेवून मंद आचेवर साधारण दोन मिनिटे शिजवा. थोड्या वेळाने तेल घालून उलटे करा. दोन्ही बाजूंनी शिजवून प्लेटमध्ये काढा. याच प्रमाणे सर्व पॅनकेक्स तयार करा. आता गरमा गरम पॅनकेक हव्या त्या चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग