Tasty Samosa Recipe: पावसाळ्यात संध्याकाळी चहासोबत काहीतरी गरमा गरम स्नॅक्स खायला प्रत्येकालाच आवडते. त्यातही कचोरी, समोसा सारखे पदार्थ तर आवडीने खाल्ले जातात. तुम्ही सुद्धा संध्याकाळी चहासोबत समोसे बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या पावसासोबत चहाची मजा डबल करण्यासाठी गरमा गरम टेस्टी समोसे कसे बनवायचे.
- १/२ किलो मैदा
- ५० मिली तूप किंवा तेल
- ५ ग्रॅम ओवा
- तळण्यासाठी तेल
- पाणी
- मीठ चवीनुसार
- १/२ किलो बटाटा
- २५ ग्रॅम काजू
- १०० ग्रॅम हिरवे वाटाणे
- १० ग्रॅम हिरवी मिरची
- १० ग्रॅम लसूण
- १० ग्रॅम आले
- १ लिंबू
- १० ग्रॅम कोथिंबीर
- ५ ग्रॅम बडीशेप
- ३ ग्रॅम लाल तिखट
- ५ ग्रॅम गरम मसाला
- १० ग्रॅम चाट मसाला
- ५ ग्रॅम जिरे
- ५ ग्रॅम हळद
- ५० मिली तेल
- मीठ चवीनुसार
टेस्टी समोसा बनवण्यासाठी प्रथम उकडलेले बटाट्याचे साल काढून घ्या आणि ते मॅश करा. आता हिरव्या मिरच्या, लसूण, आले आणि कोथिंबीर कापून बाजूला ठेवा. आता एका बाऊलमध्ये मैदा, ओवा, तेल, मीठ घ्या आणि थोडे थोडे पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ १० मिनिटे बाजूला ठेवा. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. नंतर त्यात लसूण घालून परतून घ्या. यानंतर उर्वरित साहित्य टाकून पाच मिनिटे भाजून घ्या. आता हा मसाला मॅश केलेल्या बटाट्यावर घाला. आता पीठाचा छोटा गोळा घेऊन गोल लाटून घ्या. अर्ध गोल करण्यासाठी मध्यभागी कापून घ्या. आता अर्ध्या गोलच्या काठावर पाणी लावा आणि हातात धरा आणि दोन्ही कडा जोडून त्रिकोणाचा आकार तयार करा. आता त्याच्या मध्ये बटाट्याचे तयार केलेले सारण भरून घ्या आणि वरचा भाग बंद करा.
समोसे नीट पॅक करा जेणेकरून ते तळताना फुटणार नाही. यानंतर हे समोसे गरम तेलात टाका आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुमचे टेस्टी समोसे सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.