Dal Recipe : डिनरमध्ये बनवा पहाडी चणा डाळ रेसिपी, रोजच्या जेवणाची लज्जत वाढवेल!-how to make tasty pahadi style chana dal recipe for dinner ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dal Recipe : डिनरमध्ये बनवा पहाडी चणा डाळ रेसिपी, रोजच्या जेवणाची लज्जत वाढवेल!

Dal Recipe : डिनरमध्ये बनवा पहाडी चणा डाळ रेसिपी, रोजच्या जेवणाची लज्जत वाढवेल!

Aug 05, 2024 10:58 PM IST

Dinner Recipe: रोज रात्रीच्या जेवणासाठी काय बनवावे हा प्रश्न बहुतांश घरांमध्ये महिलांना पडतो. तुम्हाला सुद्धा काही पर्याय सुचत नसतील तर तुम्ही ही पहाडी स्टाईल चणा डाळची रेसिपी ट्राय करू शकता.

पहाडी चणा डाळ
पहाडी चणा डाळ (freepik)

Pahadi Style Chana Dal Recipe: रोज डिनरमध्ये काहीतरी वेगळं बनवायचा म्हटलं तर महिलांसाठी हे कठीण काम असते. बहुतांश घरांमध्ये रात्री जेवायला काय बनवायचं? हा प्रश्न विचारला जातो. नेहमीच्या जेवणाऐवजी रात्री काहीतरी टेस्टी आणि नवीन पदार्थ बनवण्याची मागणी केली जाते. अशा वेळी तुम्ही पहाडी स्टाईल चणा डाळ बनवू शकता. ज्याची चव लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडेल. ही चणा डाळ पोळी किंवा भात या दोन्हीसोबत चविष्ट लागते. चला तर मग जाणून घेऊया पहाडी चणा डाळीची रेसिपी कशी बनवायची.

पहाडी चणा डाळ बनवण्यासाठी साहित्य

- १ कप हरभरा डाळ

- २ कांदा बारीक चिरलेला

- २ ते ३ सुक्या लाल मिरच्या

- १ चमचा जिरे

- २ इंच आल्याचा तुकडा

- १ इंच दालचिनी

- ८ ते १० काळी मिरी

- २ तमालपत्र

- २ लवंग

- २ वेलची

- १ चमचा बडीशेप

- १ चमचा लिंबाचा रस

- १ चमचा देशी तूप

- मीठ चवीनुसार

- पाणी

पहाडी स्टाईल चणा डाळ बनवण्याची पद्धत

पहाडी चणा डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप चणा डाळ नीट धुवून सुमारे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावी. दरम्यान, मिक्सर ग्राइंडरमध्ये दोन ते तीन लाल मिरच्या, आल्याचा एक तुकडा, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, एक चमचा जिरे, लवंग दोन ते तीन, दोन ते तीन वेलची, एक चमचा बडीशेप घाला. सोबत लिंबाचा रस एकत्र मिक्स करा. थोडे पाणी घालून ग्राइंडरमध्ये बारीक पेस्ट तयार करा. कुकरमध्ये चणा डाळ टाका. त्यात चवीनुसार मीठ, देशी तूप, हळद, चिमूटभर हिंग घालून शिजवावे. डाळ किमान चार ते पाच शिट्ट्यांमध्ये शिजवावे. जोपर्यंत ते चांगले वितळत नाही. कुकरचा प्रेशर निघाल्यावर कढईत तेल घालून गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात मसाला पेस्ट घालून परतून घ्या. 

झाकून दोन ते तीन मिनिटे शिजवावे. मसाला चांगला भाजून झाल्यावर मसाल्यात शिजवलेली डाळ मिक्स करा. सुमारे पाच मिनिटे शिजवा. जेणेकरून डाळ चांगली शिजते आणि मसाल्यातही मिसळते. बारीक चिरलेल्या कोथिंबीरने सजवून गरमागरम भात किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.

विभाग