Masala Methi Puri Recipe: थंडीच्या दिवसात काहीतरी चटपटीत तळलेले पदार्थ खाण्याची लालसा अनेकदा वाढू लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला नेहमीच्या जेवणाऐवजी काहीतरी वेगळं खायची इच्छा होत असेल तर तुम्ही मसाला मेथी पुरी बनवू शकता. तुम्ही ही पुरी दुपारच्या जेवणात तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. मसाला मेथी पुरीची चव वाढवण्यासाठी तुम्ही ते चविष्ट बटाटा भाजी आणि ताज्या रायत्यासोबत सर्व्ह करू शकता. ही रेसिपी खायला चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची मसाला मेथी पुरी.
- गव्हाचे पीठ
- बेसन
- रवा
- चिरलेली मेथी
- कोथिंबीर
- लसूण
- आले
- हिरवी मिरची
- जिरे
- बडीशेप
- लाल तिखट
- हळद
- धने पावडर
- तेल
- मीठ
मसाला मेथी पुरी बनवण्यासाठी प्रथम एका प्लेटमध्ये चिरलेली मेथी, कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व नीट मिक्स करा आणि बाजूला ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात लसूण, आले, हिरवी मिरची, जिरे, बडीशेप आणि पाणी घालून स्मूद पेस्ट तयार करा. ही पेस्ट मेथीच्या पानांच्या मिश्रणात मिक्स करा. आता त्यात गव्हाचे पीठ, बेसन आणि रवा घाला. आता यात लाल तिखट, धने पावडर, हळद, मीठ आणि तेल घालून पीठ मळून घ्या. आता हे पीठ ओल्या कपड्याने झाकून १० मिनिटे बाजूला ठेवा. थोड्या वेळाने पीठ थोडे मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन पुरी लाटून घ्या. पुरी लाटताना त्याला थोडेसे तेल लावा आणि पुरी मध्यम जाड असाव्या याची काळजी घ्या. आता कढईत तेल गरम करून मंद-मध्यम आचेवर पुरी तळून घ्या. तुमची टेस्टी मसाला मेथी पुरी तयार आहे. बटाट्याची भाजी, लोणचं किंवा दही, रायत्यासोबत गरमागरम पुरी सर्व्ह करा.