Masala French Toast Recipe: रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला नाश्त्यात काय बनवायचे, मुलांच्या शाळेच्या टिफीनमध्ये त्यांना काय द्यायचे हा प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी तुमचे टेन्शन दूर करेल. मसाला फ्रेंच टोस्ट ही अशीच एक लहान मुलांची आवडती रेसिपी आहे. विशेष म्हणजे तुम्हाला नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी दोन वेगळे पदार्थ बनवण्याची गरज नाही. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांना सुद्धा हे खायला आवडेल. त्यामुळे तुम्ही नाश्ता आणि टिफिन दोन्हीसाठी मसाला फ्रेंच टोस्ट बनवू शकता. ही रेसिपी बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. चला तर मग जाणून घ्या मसाला फ्रेंच टोस्टची रेसिपी.
- २ अंडी
- ब्रेड स्लाइस
- ६ चमचे दूध
- १ लहान टोमॅटो बारीक चिरून
- १ छोटा कांदा बारीक चिरलेला
- २-३ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- १/२ टीस्पून लाल मिरची पावडर
- १/२ टीस्पून काळी मिरी पावडर
- चाट मसाला
- बटर
- १/२ टीस्पून मीठ
टेस्टी मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी प्रथम हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. आता हे सर्व एकत्र करा आणि बाजूला ठेवा. आता ब्रेड स्लाइस तिरपे कापून घ्या म्हणजेच त्रिकोणी आकार तयार होईल. आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये अंडी फोडून फेटून घ्या. त्यात दूध, मीठ, तिखट आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. यानंतर एका पॅनमध्ये मध्यम आचेवर थोडे बटर टाका. दोन ब्रेड स्लाइस अंडी-दुधाच्या मिश्रणात बुडवून गरम तव्यावर ठेवा. दोन्ही बाजूंनी शिजल्यानंतर त्यांना बाहेर काढा आणि किचन पेपर टॉवेलने कव्हर करून एका प्लेटमध्ये ठेवा. सर्व ब्रेड तयार झाल्यावर ते एका प्लेटमध्ये ठेवा. आता त्यावर कांदा-टोमॅटोचा तयार केलेला मसाला आणि चाट मसाला शिंपडा. तुमचा चविष्ट मसाला फ्रेंच टोस्ट तयार आहे.
संबंधित बातम्या