मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ramadan 2024: इफ्तार पार्टीसाठी बनवा काश्मिरी चिकन पुलाव, नोट करा टेस्टी रेसिपी

Ramadan 2024: इफ्तार पार्टीसाठी बनवा काश्मिरी चिकन पुलाव, नोट करा टेस्टी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 18, 2024 12:25 PM IST

Recipe for Iftar Party: रमजानमध्ये इफ्तार पार्टीसाठी चिकन बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पाहा काश्मिरी चिकन पुलाव कसा बनवायचा.

काश्मिरी चिकन पुलाव
काश्मिरी चिकन पुलाव (freepik)

Kashmiri Chicken Pulao Recipe: जर तुम्हाला रमजानच्या पवित्र महिन्यात मित्र आणि कुटुंबीयांसाठी इफ्तारसाठी काही खास प्लॅन करायचे असेल तर काश्मिरी चिकन पुलावची ही रेसिपी ट्राय करू शकता. ज्यांना नॉनव्हेज आवडते अशा बहुतेक लोकांना ही रेसिपी खूप टेस्टी वाटते. कारण त्यात चिकन बिर्याणीसारखा जास्त मसाला टाकला जात नाही. याशिवाय हे खायला खूप चविष्ट आहे तितकेच हे बनवणे सोपे आहे. तुम्ही काश्मिरी चिकन पुलाव रायता किंवा सालानसोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काश्मिरी चिकन पुलाव बनवण्याची रेसिपी.

काश्मिरी चिकन पुलाव बनवण्यासाठी साहित्य

- ५०० ग्रॅम तांदूळ

- ६-७ चिकन थाइज

- १ कप दही

- ३-४ हिरव्या वेलची

- ३-४ दालचिनी

- २ चमचे जायफळ

- काही काळी मिरी

- ५-६ मनुके

- १ कप चिरलेला कांदा

- ५-६ लसूण कळ्या

- १ बारीक चिरलेले आले

- २ चमचे जिरे

- २ टीस्पून देसी तूप

- २ टीस्पून धने पावडर

- १ टीस्पून लाल तिखट

- तेल

- मीठ

- पाणी

काश्मिरी चिकन पुलाव बनवण्याची पद्धत

काश्मिरी चिकन पुलाव बनवण्यासाठी प्रथम ५०० ग्रॅम तांदूळ घ्या आणि २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यानंतर चिकनच्या थाइजचे छोटे तुकडे करून नीट धुवून घ्या. यानंतर १ कप दह्यात मीठ, १ चमचा लाल तिखट, १ चमचा हळद, ३ चमचे धणे पावडर आणि १ चमचा काळी मिरी पावडर मिक्स करा. ही पेस्ट चांगली फेटा. कढईत २ चमचे देशी तूप गरम करून त्यात लसूण, लवंगा आणि एक वाटी चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेले आले आणि ५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतावे. आता त्यात तयार दह्याचे द्रावण मिसळा आणि २ मिनिटे ढवळा. ग्रेव्ही शिजायला लागल्यावर त्यात चिकनचे तुकडे टाका. वरून थोडे मीठ टाका आणि १ मिनिट शिजवा. आता त्यात २ कप पाणी घालून चांगले शिजवा. लक्षात ठेवा की चिकन शिजवण्यासाठी पुरेसे पाणी वापरा कारण त्यात भात देखील शिजवावा लागतो. 

काही मिनिटांसाठी गॅस कमी करा आणि चिकन शिजू द्या. चिकन शिजल्यावर त्यात भात मिक्स करून थंड होऊ द्या. भात हलक्या हाताने ढवळून घ्या.तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा.तुमचा टेस्टी काश्मिरी चिकन पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

WhatsApp channel