Tasty Karanji Recipe: हिंदूंचा सर्वात मोठा सण दिवाळी काही दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक घरात महिलांची फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरु आहे. दिवाळीचा फराळ म्हटलं की पारंपारिक करंजी आलीच. करंजी बनवायला अनेक महिलांना किचकट काम वाटते. पण ते बनवणे खूप सोपे आहे. तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून टेस्टी करंजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दिवाळीच्या फराळासाठी करंजी कशी बनवायची.
- १५० ग्राम खोबरं
- २५० ग्रॅम मैदा
- १५० मिली दूध
- १/२ टीस्पून पांढरे तीळ
- बदाम
- काजू
- मनुके
- १/२ टीस्पून वेलची पावडर
- ४ टीस्पून पिठी साखर
- १ टीस्पून तूप
- १/२ टीस्पून किसलेले जायफळ
- ६० मिली तूप
- १/४ टीस्पून मीठ
- तळण्यासाठी तेल
करंजीचे सारण तयार करण्यासाठी प्रथम जाड तळाच्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले खोबरे हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर नारळाचा किस एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. यानंतर कढईत तीळ टाकून त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या आणि खोबरा किससोबत ठेवा. आता मिक्सरमध्ये बदाम, काजू बारीक करून घ्या. यानंतर त्यात किशमिश पिठी साखर, जायफळ, वेलची पावडर घालून सर्व काही चांगले मिक्स करा. करंजीचे पीठ तयार करण्यासाठी एका छोट्या कढईत तूप गरम करा. आता एक छोटा बाउल घ्या. त्यात गरम केलेले तूप, मैदा आणि मीठ घालून दुध टाकून कडक पीठ तयार करा. यानंतर हे मळलेले पीठ १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा.
आता करंजी बनवण्यासाठी प्रथम मळलेले पीठ समान भागांमध्ये विभागून घ्या आणि सुमारे ५ इंच मोठी पोळी लाटून घ्या. यानंतर या पिठाच्या पोळीमध्ये नारळाचे सारण भरून पोळीच्या चारही कडांना पाणी लावा. आता या कडा एकत्र करा. यानंतर काटा चमच्याच्या साहाय्याने कडांवर खुणा करा. करंजी बंद करताना घट्ट बंद करण्याची विशेष काळजी घ्यावी अन्यथा तळताना सारण बाहेर येऊ शकते. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. यानंतर या गरम तेलात करंजी घालून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या आणि टिश्यूपेपरवर काढा. तुम्ही तळण्यासाठी तूप सुद्धा वापरू शकता.
संबंधित बातम्या