मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Street Food: संध्याकाळी खायचं काही चटपटीत? ट्राय करा टेस्टी ब्रेड पकोडा चाट

Street Food: संध्याकाळी खायचं काही चटपटीत? ट्राय करा टेस्टी ब्रेड पकोडा चाट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Nov 14, 2022 02:34 PM IST

Evening Snacks Recipe: हिवाळ्यात संध्याकाळी काही तरी चटपटीत चाट खायचा आनंद घ्यायचा असेल तर ट्राय करा ब्रेड पकोडा चाट. खूप सोपी आहे ही रेसिपी.

ब्रेड पकोडा चाट
ब्रेड पकोडा चाट

Bread Pakora Chaat Recipe: सकाळच्या नाश्त्यात आणि कधी संध्याकाळी नाश्त्यामध्ये चहासोबत सर्व्ह करण्यासाठी तुम्ही अनेकदा ब्रेड पकोडे बनवले असतील. पण तुम्हाला माहीत आहे का की खायला चटपटीत ब्रेड पकोडा जेवढा टेस्टी असतो, त्यापेक्षा जास्त टेस्टी असते त्यापासून बनवलेले चाट. ही एक सोपी रेसिपी आहे आणि काही मिनिटांत तयार होते. चला जाणून घेऊया चटपटीत ब्रेड पकोडा चाट कसा बनवायचा.

ब्रेड पकोडा चाट बनवण्यासाठी साहित्य

- ब्रेड स्लाइस - ६

- बेसन - २ कप

- गरम मसाला - १/२ टीस्पून

- हिंग - २ चिमूटभर

- हिरव्या मिरच्या - २

- कोथिंबीर चिरलेली - २ चमचे

- लाल मिरची पावडर - १ टीस्पून

- ओवा - १/२ टीस्पून

- हळद - १/४ टीस्पून

- तेल - तळण्यासाठी

- मीठ - चवीनुसार

चाट बनवण्यासाठी

- कांदा - १

- टोमॅटो - १

- लाल तिखट - १/२ टीस्पून

- काळे मीठ - चवीनुसार

- भाजलेले जिरे - १/२ टीस्पून

- चाट मसाला - १/२ टीस्पून

- चिंचेची चटणी - १ टीस्पून

- बुंदी - १/४ कप

- दही - १/४ कप

- टोमॅटो सॉस - १ टीस्पून

- कोथिंबीर चिरलेली - ३ चमचे

- शेव - १/४ कप

- साधे मीठ - चवीनुसार

ब्रेड पकोडा चाट बनवण्याची पद्धत

ब्रेड पकोडा चाट बनवण्यासाठी प्रथम एका खोलगट भांड्यात बेसन, लाल तिखट, हळद, गरम मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची यासह इतर मसाले टाका, चवीनुसार मीठ घाला. आता पाणी टाकून याचे घट्ट बॅटर तयार करा. आता ब्रेड स्लाइस घेऊन त्याचे त्रिकोणी तुकडे करून ठेवा. यानंतर कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर ब्रेड स्लाइस बेसनाच्या पिठात बुडवून तळण्यासाठी कढईत ठेवा. ब्रेड पकोडे गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळा. तसेच सर्व ब्रेड पकोडे तळून घ्या.

यानंतर चाट बनवण्यासाठी सर्व प्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. आता एका प्लेटमध्ये गरमा गरम ब्रोड पकोडे ठेवा आणि मधोमध कापून घ्या. यानंतर पकोड्यांवर चवीनुसार दही घाला, लाल तिखट, जिरेपूड, काळे मीठ, साधे मीठ, हिरवी कोथिंबीर आणि इतर गोष्टी घाला. नंतर चिंचेची चटणी घालून टोमॅटो सॉस घाला. त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाका. नंतर वरून बुंदी आणि शेव घाला. तुमचे टेस्टी ब्रेड पकोडा चाट तयार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या