Bread Kachori Recipe: तुम्ही आजपर्यंत विविध प्रकारची कचोरी खाल्ली असले. अगदी डाळ टाकून केलेली असो वा बेसनच्या मसाल्याची, कचोरी खायला प्रत्येकालाच आवडते. या कचोरी बहुतेक मैदा किंवा पिठाचा वापर करून बनवल्या जातात. इतकंच नाही तर अशा कचोरी बनवायलाही बराच वेळ लागतो. तुम्हालाही कोणत्याही तामझामशिवाय, कमी वेळेत कचोरीची चव चाखायची असेल तर इन्स्टंट ब्रेड कचोरी ट्राय करू शकता. ही कचोरी टेस्टी आहे. शिवाय पटकन तयार होतात. संध्याकाळच्या चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही ही कचोरी झटपट बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या कशी बनावयची ब्रेड कचोरी
- पांढरी उडीद डाळ
- उकडलेले बटाटे
- कांदा
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- आले आणि लसूण
- ब्रेड
- लाल तिखट
- हळद
- आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस
- जिरे
- बडीशेप
- धने
- काळी मिरी
- मीठ
- पाणी
- तेल
ब्रेड कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम पांढरी उडीद डाळ भिजवा. यानंतर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण कापून बाजूला ठेवा. तसेच २ बटाटे उकळून बाजूला ठेवा. यानंतर जिरे, बडीशेप, धने आणि काळी मिरी बारीक करून घ्या. आता कढईत तेल गरम करून बडीशेप, धने आणि काळी मिरीचा तडका लावा. त्यात आले, लसूण, चिरलेली हिरवी मिरची घाला. त्यानंतर उडीद डाळ व बटाटे मॅश करून त्यात टाका. आता कढईत लाल तिखट, हळद व कोथिंबीर घालून मिक्स करा. यात हलके पाणी शिंपडून झाकण ठेवा आणि वाफेवर शिजवा. आता या मिश्रणात मीठ आणि आमचूर पावडर घालून सर्व काही नीट मिक्स करा. आता गॅस बंद करून कोथिंबीर घाला.
आता दोन ब्रेड घेऊन त्यावर पाणी लावून लाटून घ्या. आता एका ब्रेडच्या मधोमध एक चमचा तयार केलेले स्टफिंग भरून दुसरा ब्रेड वर ठेवून सर्व बाजूंनी चिकटवा. दोन्ही ब्रेड नीट पॅक झाल्यावर वाटीच्या मदतीने ब्रेड गोलाकार डिझाइनमध्ये कापून घ्या. नंतर दोन्ही ब्रेडच्या कडांवर पाणी लावून चांगले चिकटवा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात तयार केलेले ब्रेड कचोरी घालून तळून घ्या. तुमची टेस्टी ब्रेड कचोरी तयार आहे. हिरवी चटणी किंवा गोड चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या