आलू वांग्याची भाजी खाऊन कंटाळलात? ट्राय करा टेस्टी बैंगन तवा फ्राय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  आलू वांग्याची भाजी खाऊन कंटाळलात? ट्राय करा टेस्टी बैंगन तवा फ्राय

आलू वांग्याची भाजी खाऊन कंटाळलात? ट्राय करा टेस्टी बैंगन तवा फ्राय

Updated Jan 28, 2025 11:21 AM IST

आलू वांग्याची तर्रीवाली भाजी म्हटली की दोन पोळ्या जास्तच खाल्ल्या जातात. पण नेहमी नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा बैंगन तवा फ्राय. पहा ही सोपी रेसिपी

<p>बैंगन तवा फ्राय</p>
<p>बैंगन तवा फ्राय</p>

वांग्याची भाजी अनेकांना आवडते तर अनेक जण नाक मुरडतात. आलू वांग्याची भाजी असो वा वांग्याचे भरीत, याची भाजी टेस्टी लागते. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी केली असेल आणि खाल्ली असेल. तुम्ही नेहमीची तीच ती भाजी खाऊन कंटाळले असाल तर याला द्या थोडासा ट्विस्ट. एकदा बैंगन तवा फ्राय नक्की ट्राय करून पहा. विशेष म्हणजे ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते. चला तर जाणून घ्या कशी बनवायची ही भाजी.

साहित्यः

- वांगे

- तेल

- बेसन

- कोथिंबीर

- हिरवी मिरची

- आल्याचा पेस्ट

- हिंग

- जीरे पूड

- धने पूड

- आमचूर पावडर

- गरम मसाला

- तिखट

- हळद

- मीठ

 

विधीः

- सर्वप्रथम मध्यम आकाराचे किंवा लांब वांगे घ्या. ते धुवून त्याचे गोल गोल काप करून घ्या.

- आता एका बाऊलमध्ये बेसन, चिरलेली हिरवी मिरची, आले, जिरे पूड, धने पावडर, हिंग, आमचूर पावडर, गरम मसाला, तिखट, हळद, मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा.

- आता यात वांग्याचे काप टाका आणि चांगले कोट करून बाजूला ठेवून द्या.

- आता एका तव्यावर तेल टाकून गरम करा. गरम झाल्यानंतर त्यावर मसालानी कोट केलेले वांग्याचे काप टाका आणि भाजा.

- दोन्ही बाजूने बाऊनिश होईपर्यंत मंद आचेवर शिजवा आणि झाकून ठेवा.

- तुमची बैंगन तवा फ्राय रेडी आहे.

- आता एका सर्व्हिंग प्लेट मध्ये भाजी ठेवा. त्याला कोथिंबीरने गार्निश करा आणि पराठे, पोळी किंवा पुरीसोबत सर्व्ह करा.

Whats_app_banner