Soya Pancake Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायला प्रत्येकाला आवडते. पण प्रत्येक वेळी कोणते स्नॅक्स बनवावे हा प्रश्न महिलांना पडतो. तुम्हाला टेस्ट सोबत हेल्थ सुद्धा हवी असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. सोया पॅनकेकची ही रेसिपी टेस्टी असण्यासोबतच हेल्दी सुद्धा आहे. लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी तेलात बनवलेला हा प्रथिनयुक्त स्नॅक्स झटपट तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी सोया पॅनकेकची रेसिपी
- १/४ कप सोया चंक्स
- २ चमचे तांदूळ पीठ
- ३ चमचे बेसन
- १/४ कप दही
- बारीक चिरलेला कांदा
- किसलेले गाजर
- किसलेला कोबी
- कोथिंबीर
- २ हिरव्या मिरच्या
- २ लसूण पाकळ्या
- १/२ इंच आल्याचा तुकडा
- २ चमचे तीळ
- ओवा दोन चिमूटभर
- मीठ चवीनुसार
सर्वप्रथम सोया चंक्स भिजवा आणि फुलवून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात सोया चंक्स, दही, हिरवी मिरची, आले, लसूण घालून चांगले वाटून घ्या. आता एका भांड्यात सर्व बारीक चिरलेल्या आणि किसलेल्या भाज्या घ्या. त्यात सोया चंक्सचे मिश्रण मिक्स करा. तसेच बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, गरम मसाला, कोथिंबीर घाला. तसेच पांढरे तीळ घाला. सर्व चांगले मिक्स करा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून जाडसर पिठ तयार करा.
गॅसवर पॅन गरम करा. ते गरम झाल्यावर तेल घालून तयार केलेले पॅनकेकचे मिश्रण चमच्याने घेऊन थोडेसे पसरवा. एका तव्यावर दोन ते तीन पॅनकेक बनवता येतात. खूप पातळ ठेवा आणि मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत शिजवा. फक्त हिरवी चटणी किंवा केचप सोबत गरमागरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या