Soya Momos Recipe Without Using Maida: ज्या लोकांना मोमोज खाण्याची आवड असते ते हवामान आणि वेळ यावर अवलंबून नसतात. मोमोजची चव आणि लाल मसालेदार सॉस कुणाच्याही तोंडाला पाणी आणू शकतो. मात्र मोमोज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मैद्यामुळे काही लोक मोमोजला अनहेल्दी डिश मानतात. जर तुम्हीही हे अनहेल्दी असल्यामुळे मोमोज खाणे टाळत असाल तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मोमोज खावेसे वाटेल तेव्हा मास्टर शेफ पंकज भदौरिया यांची ही हेल्दी सोया मोमोज रेसिपी ट्राय करा. शेफ पंकज यांनी मोमोजच्या रेसिपीसोबत सर्व्ह केली जाणारी तिखट लाल चटणीची रेसिपी देखील शेअर केली आहे. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी सोया मोमोज कसे बनवायचे.
- १ कप रवा
- १ कप कॉर्नफ्लोर
- १ कप साबुदाणा
- २ टेबलस्पून उकडलेल्या बीटरूटचा रस
- २ कप सोयाबीन
- व्हाईट व्हिनेगर
- १ कांदा बारीक चिरलेला
- २ बारीक चिरलेले टोमॅटो
- एक चतुर्थांश कप बारीक चिरलेले गाजर
- एक चतुर्थांश कप बारीक चिरलेले बीन्स
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- १ इंच आले बारीक चिरलेले
- एक चमचा बारीक चिरलेला लसूण
- १० पाण्यात भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या
- एक चमचा सोया सॉस
- अर्धा चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा काळी मिरी पावडर
- एक चमचा साखर
- चवीनुसार मीठ
सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक कप साबुदाणा टाकून भाजून घ्यावा. जेणेकरून साबुदाण्यातील ओलावा पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर मिक्सरमध्ये भाजलेले साबुदाणे घालून पावडर तयार करा. ही पावडर चाळणीने गाळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवावी. आता त्याच भांड्यात पाव कप रवा, कॉर्नफ्लोर आणि अर्धा चमचा मीठ घालून पीठ गरम पाण्याने मळून घ्यावे. तुम्हाला हवं असेल तर मोमोजला रंग देण्यासाठी पीठात २ चमचे उकडलेल्या बीटरूटचा रस ही घालू शकता. पीठ ग्रीस करण्यासाठी एक चमचा तेल घाला. आता एका कढईत दोन कप पाणी घेऊन त्यात एक चमचा बारीक चिरलेला लसूण, एक चमचा बारीक चिरलेले आले, अर्धा चमचा साखर, एक चमचा व्हाईट व्हिनेगर, एक चमचा सोया सॉस आणि दोन कप सोयाबीन घालून सर्व काही उकळेपर्यंत शिजवावे.
सोयाबीन उकळताना हे लक्षात ठेवा की ते उकळल्यानंतर पाण्याने धुवावे लागणार नाहीत, अन्यथा त्यात घातलेल्या मसाल्यांची चव निघून जाईल. उकडलेले सोयाबीन ग्राइंडरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता एका कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात एक चमचा बारीक चिरलेला लसूण हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्यावा. यानंतर कढईत लसूण सोबत पाव कप बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. आता कढईत एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप बारीक चिरलेले गाजर, सोयाबीन, एक चमचा मीठ, एक चमचा काळी मिरी पावडर आणि बारीक केलेले सोयाबीन घालून चांगले परतून घ्यावे. जेणेकरून सोयाबीनचे सर्व पाणी कोरडे होईल.
आता मोमोज तयार करण्यासाठी आधी तयार केलेल्या पीठाचे लहान गोळे घ्या आणि कॉर्न फ्लोरमध्ये गुंडाळा. आता हा लाटून घ्या. या पुरीमध्ये मोमोजचे स्टफिंग मधोमध ठेवून फोल्ड करून मोमोजचा आकार द्या. हे मोमोज स्टीम करून घ्या. तुमचे चविष्ट सोया मोमोज तयार आहेत.
चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम १० पाण्यात भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या, २ बारीक चिरलेले टोमॅटो ग्राइंडरमध्ये पेस्ट तयार करा. यानंतर एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात पाव कप बारीक चिरलेला लसूण घालून हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर पॅनमध्ये एक चमचा काश्मिरी लाल मिरची आणि आधी तयार केलेली टोमॅटो पेस्ट घाला. कढईत चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालून सॉस थोडा घट्ट होईपर्यंत परतून घ्या. शेवटी चटणीत एक चमचा व्हाईट व्हिनेगर घालून थंड होण्यासाठी ठेवा.
संबंधित बातम्या