Soya Chaap Recipe: सोया चाप चविष्ट तसेच आरोग्यदायी आहे. प्रोटीन रिच असल्याने बहुतेक शाकाहारी लोकांना ते खाणे आवडते. पण बाजारात मिळणारे सोया चाप अनेक वेळा अत्यंत अस्वच्छ पद्धतीने सोया चाप बनवण्यात येतात. तसेच अनेक वेळा बाहेर मिळणाऱ्या सोया चापमध्ये प्रथिने कमी म्हणजेच सोया कमी आणि मैदा जास्त असते. अशावेळी तुम्ही काही मिनिटात घरी हेल्दी प्रोटीनयुक्त सोया चाप बनवू शकता. मास्टरशेफ पंकज भदोरिया यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर सोया चाप बनवण्याच्या खास टिप्स दिल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया घरी सोया चाप कसा बनवायचा.
- एक कप मैदा आणि एक कप पाणी घालून चांगले मिक्स करून बाजूला ठेवा.
- पाण्यात सोयाचे चंक्स टाकून सुमारे आठ मिनिटे शिजवावे.
- नंतर थंड पाण्याने धुवून पिळून घ्या.
- हे मिक्सरमध्ये टाकून पेस्ट तयार करा.
- आता एका मोठ्या भांड्यात पाणी घालून गरम करा.
- आता मैद्याच्या बॅटरमध्ये मीठ आणि सोया चंक्सची पेस्ट घाला.
- तसेच एक कप सोयाबीनचे पीठ घालावे.
- हे नीट हातांनी मिक्स करा.
- थोडे तेल घालून पोळीच्या पिठाप्रमाणे चांगले मळून घ्यावे.
- आता हे पीठ दहा मिनिटे बाजूला ठेवा.
- तयार पीठाची पोळी लाटून घ्या.
- या पोळीच्या दोन सेंटीमीटर पट्ट्या कापून घ्याव्यात.
- आता या सोया स्ट्रिप्स आईस्क्रीम स्टिकवर गुंडाळा.
- सोया स्ट्रिप गुंडाळण्यापूर्वी काडीला थोडे मैदाचे बॅटर लावा. जेणेकरून ते सहज चिकटून राहतील.
- अशा पद्धतीने सर्व सोया स्टिक तयार करून घ्या.
- आता या तयार सोया स्टिक गरम पाण्यात टाकून झाकून ठेवा.
- जेव्हा ते शिजतात आणि वर तरंगतात तेव्हा त्यांना बाहेर काढून थंड करा.
- फक्त स्टिकवरून काढून कापून घ्या. तुम्हाला हवी असलेली, आवडती डिश बनवा.