Raw Mango Chutney Recipe: उन्हाळा सुरु झाला की बहुतांश घरांमध्ये कैरी आणि आंब्याचे विविध पदार्थ बनवले जातात. लोकांना फक्त पिकलेले आंबेच खायला आवडत नाही तर कच्च्या कैरी सुद्धा खायला आवडतात. या कैरीपासून पन्हं, चटणी, लोणचे असे विविध प्रकार केले जातात. उन्हाळ्यात दिवसांमध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी जेवणासोबत रायता, चटणी, लोणचं सर्व्ह केल्या जातं. तुम्हाला सुद्धा कोणती चटणी बनवावी असा प्रश्न पडला असेल तर यावेळी कैरीची ही चटणीच्या रेसिपी ट्राय करा. ही चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते. विशेष म्हणजे या चटणीची रेसिपी फक्त चव देत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी आवडेल. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी कैरीची चटणी कशी बनवावी
- कैरी (मोठी असेल तर १, लहान असल्यास २)
- १ हिरवी मिरची
- १ इंच तुकडा आले
- १/२ कप कोथिंबीर
- १/४ कप पुदिन्याची पाने
- ३ ते ४ लसूण पाकळ्या
- १/२ टीस्पून जिरे
- चवीनुसार मीठ
कैरीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरी सोलून नीट स्वच्छ करा. नंतर त्याचे लहान तुकडे करा. आता पुदिना आणि कोथिंबीर सुद्धा स्वच्छ करा. आता ब्लेंडिंग जार घ्या आणि त्यात कैरीचे तुकडे, पुदिना आणि कोथिंबीर घाला. सोबत हिरवी मिरची, आले, लसूण पाकळ्या आणि जिरे टाका. तुम्हाला आवडत असेल तर त्यात हिंग सुद्धा टाकू शकता. आता त्यात १ कप पाणी घाला आणि सर्व साहित्य एकत्र ब्लेंड करा. हे जर नीट बारीक झाले नसेल तर त्यात अजून थोडे पाणी घालून ब्लेंड करा. पण जास्त पाणी घालू नका. आता हे नीट ब्लेंड झाल्यावर ते एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ टाका. तुमची कैरीची चटणी तयार आहे.