Mix Dal Cutlet Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी टेस्टी स्नॅक्स हवे असते. विशेषतः पावसाळ्यात भजे, वडे खाण्याची क्रेविंग अनेकांना होते. पण नेहमी भजे, पकोडे खाण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही मिक्स डाळींचे कटलेट बनवू शकता. तूर डाळ आणि हरभरा डाळ मिक्स करून तयार केलेले हे कटलेट टेस्टी आणि हेल्दी आहे. ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे टेस्टी आणि हेल्दी मिक्स डाळ कटलेट.
- १/२ कप हरभरा डाळ
- ३ चमचे तूर डाळ
- १ कप उडीद डाळ
- तांदळाचे पीठ
- कांदा बारीक चिरलेला
- १ कप पालक चिरलेले
- २ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- कढीपत्ता
- १ टीस्पून बडीशेप
- लाल तिखट
- चिमूटभर हिंग
- मीठ चवीनुसार
मिक्स डाळीचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम हरभरा डाळ, तूर डाळ आणि उडीद डाळ नीट धुवून घ्या. नंतर साधारण दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवा. ते नीट भिजल्यानंतर त्याचे पाणी गाळून घ्या. या सर्व डाळी ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. डाळ बारीक करताना त्यात पाणी टाकू नये. तसेच डाळ एकदम बारीक करू नये, त्याची थोडी जाडदर पेस्ट करावी, हे लक्षात ठेवा. आता ही पेस्ट एका भांड्यात काढून त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. आता त्यात बारीक चिरलेले पालक, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, मीठ, बडीशेप, लाल तिखट घाला आणि चांगले मिक्स करा. हाताला तेल लावा आणि ही पेस्ट मिक्स केल्यानंतर लहान आकाराचे गोळे बनवा. नंतर थोडे चपटे करून कटलेटसारखा आकार द्या.
तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे तेलात तळून घेऊन शकता. किंवा तुम्ही ते २०० डिग्री सेल्सिअसवर मायक्रोव्हेवमध्ये बेक देखील करू शकता. तुमचे टेस्टी आणि हेल्दी मिक्स डाळ कटलेट तयार आहे. चहासोबत किंवा आवडत्या चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.