Tasty and Healthy Khichdi Recipe: बहुतेक वेळा रात्रीच्या जेवणात खिचडी बनवली जाते. जेव्हा स्वयंपाकासाठी जास्त वेळ नसेल किंवा काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा असेल अशा वेळी खिचडीचा पर्याय सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतो. पण अनेक वेळा लहान मुलेच नाही तर मोठे देखील खिचडी खाण्याचा कंटाळा करतात. तुम्ही डिनरमध्ये खिचडी बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी त्याला टेस्टी आणि हेल्दी ट्विस्ट द्या. नेहमीची खिचडी देखील सर्व जण आवडीने खातील. ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायला चविष्ट आहे. चला तर मग जाणून घ्या टेस्टी आणि हेल्दी खिचडी कशी बनवायची.
- २ वाटी तांदूळ
- अर्धा कप डाळ
- १०० ग्रॅम पनीर
- १५० ग्रॅम पालक
- २ कांदे बारीक चिरलेले
- १ टोमॅटो बारीक चिरलेला
- ८-१० पाकळ्या लसूण बारीक चिरलेला
- २ हिरव्या मिरच्या
- आल्याचा तुकडा
- हिंग
- लाल तिखट
- जिरे
- मीठ चवीनुसार
- तेल
ही टेस्टी आणि हेल्दी खिचडी बनवण्यासाठी प्रथम पालक धुवून चिरून घ्या. तसेच डाळ आणि तांदूळ धुवून भिजवावे. आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा भाजल्यावर त्यात हिरवी मिरची, टोमॅटो आणि हळद घालून मिक्स करा. हे चांगले भाजल्यानंतर त्यात पालक घाला. आता पनीरचे तुकडे घालून परतून घ्या. नंतर त्यात तांदूळ आणि डाळ घाला. आता या मीठ घालून मिक्स करा. आणि नंतर पाणी घालून कुकरचे झाकण लावा. साधारण दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.
आता खिचडीसाठी तडका तयार करा. यासाठी पॅनमध्ये तूप किंवा तेल घ्या. ते गरम झाल्यावर त्यात जिरे आणि लसूण घालून सोनेरी परतून घ्या. लाल तिखट घालून गॅस बंद करा आणि तयार खिचडीवर हा तडका घाला. तुमची टेस्टी आणि हेल्दी खिचडी तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या