Khajoor Halwa Recipe: अनेक लोकांना जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खायला आवडते. त्यातही सण-उत्सवांच्या काळात वेगवेगळ्या मिठाई आवडीने खाल्ल्या जातात. पण सतत मिठाई, गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक ठरू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला डेझर्टमध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही खजूर हलवा बनवू शकता. खजूर हलवा खायला खूप टेस्टी तर आहेच पण तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेईल. खजूरमध्ये भरपूर फायबर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असतात, जे पोटाच्या समस्यांसोबतच बद्धकोष्ठता, रक्तदाब, थकवा यापासून आराम देतात. खजूर हलव्याची रेसिपी हेल्दी असण्यासोबतच बनवायला सुद्धा सोपी आहे. ही रेसिपी तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच तुमची गोड खाण्याची क्रेविंग सुद्धा कमी करेल. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या कसा बनवायला खजूर हलवा.
- २०० ग्रॅम खजूर
- १ कप दूध
- दीड कप बारीक केलेली साखर
- १/४ कप तूप
- १०० ग्रॅम काजू
- १/४ टीस्पून वेलची पावडर
टेस्टी आणि हेल्दी खजूर हलवा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दूध आणि खजूर उकळून घ्या. गॅसची फ्लेम कमी ठेवून दूध घट्ट होईपर्यंत ते चांगले शिजवा. आता त्यात तुपात तळलेले काजू घाला. जेव्हा हे खजूरचे दूध घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यात साखर आणि तूप घाला. खजुराचे दूध आटून पॅनची कडा सोडू लागल्यावर त्यात वेलची पावडर टाका आणि मिक्स करा. आता एका भांड्याला तूप लावून ग्रीस करून त्यात हे मिश्रण टाकून सेट करायला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर तुमच्या आवडत्या आकारात कापून घ्या. ड्राय फ्रूट्सने गार्निश करून सर्व्ह करा.