मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Halwa Recipe: मकर संक्रांतीला बनवा टेस्टी गुळाचा हलवा, हेल्दी आहे ही रेसिपी

Halwa Recipe: मकर संक्रांतीला बनवा टेस्टी गुळाचा हलवा, हेल्दी आहे ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 10, 2024 03:07 PM IST

Makar Sankranti Special Recipe: मकर संक्रांतीसाठी काहीतरी स्पेशल बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गुळाचा हलवा बनवू शकता. ही रेसिपी फक्त टेस्टी नाही तर हेल्दी सुद्धा आहे. जाणून घ्या कसे बनवावे.

गुळाचा हलवा
गुळाचा हलवा (freepik)

Jaggery or Gul Halwa Recipe: मकर संक्रांतीला गुळाचे विविध पदार्थ बनवले जातात. १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे. या दिवशी तुम्हाला खास बनवण्यासाठी काही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ट्राय करायची असेल तर ही गुळाच्या हलव्याची रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. गुळाचा हलवा हिवाळ्यातील फेव्हरेट डेझर्टच्या रेसिपींपैकी एक आहे. ही रेसिपी खायला चविष्ट तर आहेच पण बनवायलाही तितकीच सोपी आहे. गुळाचा हलवा चवीला खूप चांगला असतो आणि शरीरासाठीही खूप फायदेशीर आहे. गुळाचा हलवा खाल्ल्याने थंडीतही शरीराचे तापमान राखण्यास मदत होते. जाणून घ्या टेस्टी आणि हेल्दी गुळाचा हलवा कसा बनवायचा.

गुळाचा हलवा बनवण्यासाठी साहित्य

- १ कप रवा

- १ वाटी गूळ (पाण्यात भिजवलेला)

- अडीच टेबलस्पून तूप

- १/२ टीस्पून वेलची पावडर

- ५० ग्रॅम चिरलेला पिस्ता

- ५० ग्रॅम चिरलेला बदाम

- ४ चमचे साखर

- १ चिमूट केशर

गुळाचा हलवा बनवण्याची पद्धत

गुळाचा हलवा बनवण्यासाठी प्रथम रवा सुमारे २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यानंतर एका जड तळाच्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर त्यात गुळाचे पाणी घालून चांगले मिक्स करा. आता कढईत साखर घाला आणि हे मिश्रण मध्यम आचेवर चांगले मिक्स करा. साखर रव्याबरोबर चांगली मिसळेल याची विशेष काळजी घ्या. थोडा वेळ शिजल्यानंतर या हलव्यात पिस्ता, बदाम आणि केशर घाला. हलव्याचा सुगंध येऊ लागला आहे असे वाटल्यावर त्यात वेलची पूड टाका. हलवा चांगला घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. तुमचा गुळाचा हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

WhatsApp channel