Chutney Recipe: केवळ चवच नाही तर आरोग्याचीही काळजी घेते कढीपत्त्याची चटणी, नोट करा रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chutney Recipe: केवळ चवच नाही तर आरोग्याचीही काळजी घेते कढीपत्त्याची चटणी, नोट करा रेसिपी

Chutney Recipe: केवळ चवच नाही तर आरोग्याचीही काळजी घेते कढीपत्त्याची चटणी, नोट करा रेसिपी

Jun 19, 2024 02:52 PM IST

Tasty and Healthy Recipe: कोथिंबीर, पुदिना, चिंच यांसारख्या रुटीन चटण्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही टेस्टी आणि हेल्दी कढीपत्त्याची चटणी ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया बनवण्याची पद्धत

कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी
कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी (freepik)

Curry Leaves Chutney Recipe: जेवणाची चव वाढवण्यासाठी असो किंवा केसांसाठी कढीपत्त्याचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. कढीपत्ता अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. सामान्यत: घरातील स्त्रिया जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा तडकामध्ये वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का कढीपत्त्याचा वापर चटणी बनवण्यासाठीही केला जातो. कढीपत्त्यापासून बनवलेली चटणी केवळ खायलाच चविष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यामुळे कोथिंबीर, पुदिना, चिंच यांसारख्या नियमित चटण्या खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही हेल्दी आणि टेस्टी कढीपत्त्याची चटणी ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया कढीपत्त्याची चटणी बनवण्याची रेसिपी

कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 

- १/२ कप कढीपत्ता

- ५ लसूण पाकळ्या

- २ टीस्पून कोथिंबीर

- १ इंच आल्याचा तुकडा

- २ चमचा शेंगदाणे

- २ चमचे तिळाचे तेल

- १ तुकडा चिंचेचे

- मीठ चवीनुसार

- १ कप पाणी

- १ कप नारळाचे कीस

तडक्यासाठी साहित्य

- ४ कढीपत्ताचे पानं

- ५ लाल मिरच्या

- २ चमचे तेल

- १ टीस्पून हिंग

- अर्धा चमचा मोहरी

- अर्धा चमचा उडीद डाळ

कढीपत्त्याची चटणी बनवण्याची पद्धत

कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि चिरलेली हिरवी मिरची घालून थोडा वेळ परतून घ्या. यानंतर कढईत शेंगदाणे, कढीपत्ता आणि चिंच घालून सतत ढवळत परतून घ्या. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि शिजल्यावर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर सर्व भाजलेल्या वस्तू मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता त्यात किसलेले नारळ, कोथिंबीर, पाणी, कढीपत्ता आणि मीठ घालून सर्व काही नीट मिक्स करा. 

आता कढईत चटणीचा तडका तयार करण्यासाठी त्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, उडीद डाळ, संपूर्ण लाल मिरची आणि कढीपत्ता घालून तडका करून चटणीवर टाका. तुमची टेस्टी आणि हेल्दी कढीपत्त्याची चटणी तयार आहे.

Whats_app_banner