Bajra Ladoo: बाजरा आणि तिळाचे लाडू बनवणे आहे सोपे, चवीसोबत हेल्दी आहे ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bajra Ladoo: बाजरा आणि तिळाचे लाडू बनवणे आहे सोपे, चवीसोबत हेल्दी आहे ही रेसिपी

Bajra Ladoo: बाजरा आणि तिळाचे लाडू बनवणे आहे सोपे, चवीसोबत हेल्दी आहे ही रेसिपी

Published Jan 15, 2024 07:09 PM IST

Healthy Recipe: मकर संक्रांतीला बाजरा आणि तिळाला विशेष महत्त्व आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र करून तुम्ही यापासून हेल्दी लाडू बनवू शकता. कसे ते पाहा.

बाजरी आणि तिळाचे लाडू
बाजरी आणि तिळाचे लाडू (freepik)

Bajra and Tils Ladoo Recipe: मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रत्येक घरात तिळगुळाचे लाडू बनवले जातात. पण तिळाच्या सोबत आणखी काही आरोग्यदायी गोष्टी टाकायच्या असतील तर तुम्ही यात बाजरी टाकू शकता. बाजरी आणि तिळाचे हे लाडू केवळ हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवत नाही तर ते फायबरमध्ये समृद्ध असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही बाजरी फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घ्या टेस्टी आणि हेल्दी बाजरी आणि तिळाचे लाडू कसे बनवायचे.

बाजरी आणि तिळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य

- २०० ग्रॅम बाजरीचे पीठ

- १०० ग्रॅम तीळ

- दीड वाटी गूळ

- अर्धी वाटी तूप

- १०-१२ काजू,

- १०-१२ बदाम

- दोन चमचे डिंक

- दोन चमचे किसलेले खोबरे

- वेलची पावडर

बाजरी आणि तिळाचे लाडू बनवण्याची पद्धत

हे लाडू बनण्यासाठी प्रथम एक जाड तळाचा पॅन किंवा कढई घ्या. त्यात देशी तूप गरम करून डिंक तळून घ्या. डिंक अगदी मंद आचेवर तळून घ्यावा. जेणेकरून डिंक फुगतो आणि मोठा होतो. नंतर ते एका प्लेटमध्ये काढा. आता कढईत उरलेल्या तुपात बाजरीचे पीठ मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजा. पीठाला सुवासिक वास येऊ लागला की ताटात काढा. दुसऱ्या पॅनमध्ये पांढरे तीळ कोरडे भाजून घ्या. तीळ सुद्धा मंच आचेवर भाजा. आता गुळाचे छोटे तुकडे करा जेणेकरून ते सहज वितळेल. आता एका कढईत गूळ टाका आणि मंद आचेवर गूळ वितळू द्या. थोडे पाणी घाला. जेणेकरून गूळ सहज वितळतो आणि जळत नाही. भाजलेल्या पिठात बदाम, काजू आणि तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स मिक्स करा. डिंक किंचित जाडसर बारीक करा, ज्यामुळे डिंकाचा आकार लहान होतो. आता सर्व गोष्टी गुळात मिक्स करा. हे मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर लगेच लाडू बनवा. तुमचे टेस्टी आणि हेल्दी बाजारी आणि तिळाचे लाडू तयार आहेत.

Whats_app_banner