मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  केवळ तोंडाची चव नाही तर भूखही वाढवते चटपटीत आमचूर चटणी, नोट करा ही रेसिपी

केवळ तोंडाची चव नाही तर भूखही वाढवते चटपटीत आमचूर चटणी, नोट करा ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 15, 2023 01:22 PM IST

रोजच्या जेवणात लोणचं, चटणी असेल तर जेवणाची लज्जत आणखी वाढते. चटपटीत आमचूर चटणी कशी बनवायची जाणून घ्या.

आमचूर चटणी
आमचूर चटणी (pexels)

Amchoor Chutney Recipe: आजकाल बहुतेक लोक व्हायरल तापामुळे तोंडाला चव खराब झाल्याची तक्रार करत आहेत. तुम्हाला किंवा घरातील कोणाला अशी काही तक्रार असेल तर आमचूर चटणी तोंडाची चव सुधारण्यास मदत करू शकते. जेवणासोबत दिलेली ही चटणी चवीला खूप चविष्ट आहे. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया आमचूर चटणी कशी बनवायच.

आमचूर चटणी बनवण्यासाठी साहित्य

- २ चमचे आमचूर पावडर

- २-३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- चवीनुसार मीठ

- १ कप चिरलेली कोथिंबीर

- १ चिरलेला टोमॅटो

- १ चिरलेला कांदा

आमचूर चटणी बनवण्याची पद्धत

आमचूर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या जार मध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाका आणि बारीक करुन घ्या. आता यात कोथिंबीर आणि आमचूर पावडर टाकून नीट बारीक करा. शेवटी मीठ टाकून चांगले मिक्स करुन घ्या. तुमची चविष्ट आमचूर चटणी तयार आहे. तुम्ही ही भात, पराठे आणि स्नॅक्ससोबत सर्व्ह करू शकता.

ही चटणी जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी चटणी ज्या बरणीत किंवा भांड्यात ठेवणार आहे त्यात पाणी नसेल याची काळजी घ्या. अन्यथा चटणी लवकर खराब होते. चटणी साठवण्यासाठी ती थंड आणि कोरड्या जागी ठेवावी. यासाठी एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. याशिवाय बरणीत कधीही चटणी पूर्णपणे भरू नका, त्यात अर्धा इंच जागा सोडा. चटणीवर तेलाचा पातळ थर घाला. कारण तेल चटणीला सील करण्यास आणि खराब होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते.

WhatsApp channel

विभाग