Tandoori Paneer Tikka Recipe: जर तुम्हाला पनीर खाण्याची आवड असेल आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला आवडत असेल तर तंदूरी पनीर टिक्काची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. इव्हनिंग स्नॅक्सपासून ते पार्टी स्टार्टरपर्यंत या रेसिपीची चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. ओव्हनचा वापर सहसा तंदूरी रेसिपी बनविण्यासाठी केला जातो. पण या रेसिपीची विशेषता म्हणजे हे बनवण्यासाठी ओव्हनची सुद्धा गरज भासत नाही. तुम्ही हे घरचा गॅसचा वापर करून देखील सहज बनवू शकता. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या ओव्हनशिवाय तंदूरी पनीर टिक्का कसा बनवायचा.
- पनीरचे तुकडे
- २ चमचे भाजलेले बेसन
- १/२ कप हँग्ड कर्ड
- २ चमचे फ्रेश क्रीम
- कांदा
- शिमला मिरची
- टोमॅटो
- ३ चमचे आले लसूण पेस्ट
- १ टीस्पून हिरवी मिरची आणि ताजी कोथिंबीर
- ३ चमचे शिजवलेले मोहरीचे तेल
- ३ चमचे लाल तिखट
- १ टीस्पून ओवा
- १/२ टीस्पून जिरे पूड
- १ टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून काळे मीठ
- १ टीस्पून वितळलेले लोणी
- मीठ चवीनुसार
तंदुरी पनीर टिक्का बनवण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये मोहरीचे तेल, ३ चमचे लाल तिखट, बेसन, अर्धा कप हँग्ड कर्ड, ३ चमचे आले लसूणची पेस्ट, ओवा, हिरव्या मिरच्या, जिरे, गरम मसाला, चाट मसाला, काळे मीठ, चिरलेली कोथिंबीर, मीठ टाकून मिक्स करा. आता यात चिरलेल्या भाज्या म्हणजे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून मिक्स करा. शेवटी त्यात परनीचे तुकडे घालून सर्व काही चांगले मिक्स कराव. आता ग्रिलवर तेल लावून पनीर टिक्का थेट गॅसवर शिजवा.
यानंतर एका बाऊलमध्ये पनीर टाकून त्यात थोडे कांद्याचे काप, २ चमचे फ्रेश क्रीम, १ चमचा वितळलेले लोणी, चाट मसाला आणि बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे. तुमचे तंदूरी पनीर टिक्का सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
संबंधित बातम्या