Sweet Potato Kheer Recipe: हिंदू कॅलेंडरनुसार आजपासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. हा पवित्र महिना भगवान शंकराला समर्पित असतो. या संपूर्ण महिन्यात महादेवाचे भक्त भगवान शंकराची पूजा करतात आणि उपवास करण्याबरोबरच विविध गोष्टींचा प्रसाद अर्पण करतात. असे मानले जाते की श्रावण महिन्यात मनापासून महादेवाची पूजा केल्यास इच्छित आशीर्वाद मिळतो. तुम्हालाही महादेवासाठी प्रसादात काही चविष्ट आणि वेगळ्या रेसिपी ट्राय करायच्या असतील तर चटकन रताळ्याची खीर प्रसादासाठी बनवा. ही उपवासाची हेल्दी रेसिपी चवदार आणि पटकन तयार होते. चला तर मग जाणून घेऊया उपवासासाठी रताळ्याची खीर कशी बनवावी.
- १ किसलेले रताळे
- १ कप ताजे किसलेले नारळ
- १ हिरवी वेलची
- २ कप दूध
- १ टेबलस्पून गूळ
- १ मोठा चमचा भगर
- ४-५ केशर धागे दुधात भिजवलेले
- अर्धा कप बदाम आणि पिस्ता
- गुलाबाच्या पाकळ्या गार्निशिंगसाठी
रताळ्याची खीर बनवण्यासाठी प्रथम मिक्सरमध्ये नारळ आणि वेलची टाकून थोड्या पाण्याने बारीक करून घ्या. हे करत असताना नारळातून जास्तीत जास्त दूध काढून टाकावे. आता एका कढईत दूध काढलेले नारळ, किसलेले रताळे, दूध, साखर, केशर घालून उकळून घ्या. खीरचा गोडवा संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही चिमूटभर सैंधव मीठ घालू शकता. खीर शिजल्यावर आणि किंचित घट्ट झाल्यावर त्यात शिजवलेली भगर घालून घट्ट होऊ द्या. दरम्यान, अधूनमधून खीर हलवत रहा. आता खीरमध्ये बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स घाला आणि खीर १० मिनिटे शिजवा.
दहा मिनिटांनी गॅस बंद करून वर गुलाबाच्या पाकळ्या घालून खीर सजवा. महादेवाला रताळ्याच्या खीरचा प्रसाद अर्पण करा.