Winter Recipe: अनेकदा सकाळी नाश्ता बनवायला वेळ नसतो. प्रयत्न करूनही नाश्ता न करता घराबाहेर पडतात. पण नाश्ता करणे फार महत्त्वाचे आहे. नाश्ता स्किप झाला तर दिवसभर ऊर्जा राहत नाही. नाश्ता सकाळपासूनच शरीरात ऊर्जा आणि हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतो. सकाळी वेळ नसला की झटपट तयार होणाऱ्या रेसिपीचा शोध घेतला जातो. जेव्हा तुमच्याकडे सकाळी काही खायला जास्त वेळ नसतो तेव्हा तुम्ही गोड रोटी (gud roti) बनवून खाऊ शकता. ही रोटी बनवायला खूप सोपी असते. जास्त वेळ न घालवता तुम्ही ही रोटी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया घरी गोड रोटी बनवण्याची रेसिपी.
गोड रोटी बनवण्यासाठी तुम्हाला गव्हाचे पीठ मळून घ्या. एका बाजूला गूळ फोडून ठेवा. नंतर तयार केलेल्या कणकेपासून गोळा बनवून घ्या. या गोळ्यात मध्ये भाग पडून त्यात गूळ भरा. नंतर ही रोटी छान गोलाकार लाटून घ्या. तव्यावर चांगले शिजवून घ्या. यानंतर वरून थोडं तूप लावून पालटून घ्या. अशा प्रकारे तुमची गोड रोटी तयार होईल. ही रोटी शरीराला ताकद देण्यासोबतच हे खाणे तुमच्यासाठी मेंदूला चालना देणारे ठरू शकते. याशिवाय शरीराला उबदार ठेवण्यासाठीही ही रोटी हिवाळ्यात उत्तम आहे.
ही गॉड रोटी कॅलरी जास्त आणि उर्जेने भरलेले असते. याच्या सेवनाने तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे दीर्घकाळ भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याशिवाय तुमच्या घरातील मोठे ते छोटे सगळ्यांनाच ही रोटी खायला आवडेल. याशिवाय तुम्ही ही रोटी दुधासोबत किंवा इतर गोष्टींसोबतही खाऊ शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)