Pakode Recipe: चहासोबत बनवा टेस्टी स्वीट कॉर्न पकोडे, एकदा ट्राय करा चटपटीत रेसिपी-how to make sweet corn pakode recipe for tea time snacks ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pakode Recipe: चहासोबत बनवा टेस्टी स्वीट कॉर्न पकोडे, एकदा ट्राय करा चटपटीत रेसिपी

Pakode Recipe: चहासोबत बनवा टेस्टी स्वीट कॉर्न पकोडे, एकदा ट्राय करा चटपटीत रेसिपी

Sep 20, 2024 06:34 PM IST

Tea Time Snacks Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खायचा विचार असेल तर स्वीट कॉर्न पकोडे बनवा. जाणून घ्या याची रेसिपी.

Tea Time Snacks Recipe: स्वीट कॉर्न पकोडे
Tea Time Snacks Recipe: स्वीट कॉर्न पकोडे (freepik)

Sweet Corn Pakode Recipe: पावसाळ्याच्या दिवसात भजे, पकोडे खायला सर्वांनाच आवडतात. त्याचबरोबर या ऋतूत मका खाण्याची मजा काही औरच असते. मक्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक म्हणजे देशी मका आणि दुसरा स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्नची चव खूप चांगली असते. त्यात सौम्य गोडवा असतो. यापासून विविध प्रकारचे पदार्थही तयार केले जातात. येथे आम्ही तुम्हाला स्वीट कॉर्न पकोडे कसे बनवायचे ते सांगत आहोत. हे कुरकुरीत पकोडे चहाबरोबर सर्व्ह करता येतात. जर तुमच्याकडे स्वीट कॉर्नचे दाणे असतील तर तुम्ही घरात असलेल्या घटकांपासून स्वीट कॉर्नचे पकोडे बनवू शकता. काही लोक हे पकोडे पावमध्ये टाकून खातात. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. क्रिस्पी स्वीट कॉर्न पकोडे कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.

स्वीट कॉर्न पकोडे बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- २ कप उकडलेले स्वीट कॉर्न दाणे

- अर्धा कप बेसन

- २ चमचे तांदळाचे पीठ

- एक छोटा कप बारीक चिरलेला कांदा

- १ टीस्पून आले लसूण पेस्ट

- २ चिमूटभर हळद

- १/२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर

- एक चमचा चाट मसाला

- चिमूटभर हिंग

- मीठ चवीनुसार

- तळण्यासाठी तेस

स्वीट कॉर्न पकोडे बनवण्याची पद्धत

हे क्रिस्पी चटपटीत पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम स्वीट कॉर्नचे दाणे घेऊन मिक्सरमध्ये हलके बारीक करून घ्यावेत. नंतर त्याचे पाणी पिळून एका भांड्यात बाहेर काढावे. नंतर त्यात कांदा घाला. बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल मिरची पावडर, चाट मसाला, आले लसूण पेस्ट, हिंग आणि मीठ घाला. नंतर हे पाण्याशिवाय चांगले मिक्स करा. याची घट्ट बॅटर तयार होईल. आता तयार केलेल्या या कॉर्न बॅटरमधून थोडे थोडे घ्या आणि गरम तेलात घाला. पकोडे कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. हे तळायला किमान १० ते १५ मिनिटे लागतील. तुमचे स्वीट कॉर्न पकोडे तयार आहे. गरमा गरम चहा किंवा हिरवी चटणी किंवा केचपसोबत सर्व्ह करा.

Whats_app_banner