Sweet and Sour Amla Achar Recipe: आवळ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबतच ते शरीराला सर्व प्रकारच्या संक्रमणांशी लढण्यासाठी तयार करते. थंडीत शरीराची काळजी घेण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा हिवाळ्यात वनौषधीप्रमाणे काम करतो. त्यामुळे त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्यापासून तुम्ही टेस्टी गोड आणि आंबट लोणचे बनवू शकता. हे लोणचे बनवायला सोपे आणि टेस्टी आहे. जाणून घ्या हे टेस्टी आणि हेल्दी लोणचे कसे बनवयाचे.
- आवळा
- मेथी
- कलौंजी
- जिरे
- मोहरी
- बडीशेप
- धणे
- हिंग
- गूळ
- लाल तिखट
- हळद
- धणे पावडर
- काळे मीठ
- तेल
हे लोणचे बनवण्यासाठी अर्धा किलो आवळा घ्या आणि ते नीट धुवून स्वच्छ करा. आवळा नीट पुसून कोरडे करा. आता आवळा मऊ होईपर्यंत वाफेवर शिजवा. किमान १०-१५ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. तुम्ही प्रेशर कुकरमध्ये सुद्धा हे शिजवू शकता. आता आवळ्याच्या बिया आणि गर वेगळे करा. नंतर एका कढईत १ टेबलस्पून तेल घ्या. त्यात १ टेबलस्पून मेथी दाणे, कलौंजी, जिरे, मोहरी आणि बडीशेप समान प्रमाणात घाला. नंतर त्यात १ चमचा धणे आणि थोडी हिंग घाला. आता त्यात उकडलेले आवळे घाला आणि ५ मिनिटे चांगले परतून घ्या. नंतर त्यात १/२ कप गूळ घालून मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत आणि मिश्रण किंचित घट्ट होईपर्यंत शिजवा. हे घट्ट झाल्यावर मंद आचेवर ठेवा आणि त्यात लाल तिखट, हळद, धनेपूड आणि काळे मीठ घाला. तुमचे आवळ्याचे आंबट गोड लोणचे तयार आहे.