मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Pizza Day निमित्त घरी बनवा हेल्दी पिझ्झा, नोट करा रेसिपी!

National Pizza Day निमित्त घरी बनवा हेल्दी पिझ्झा, नोट करा रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 09, 2024 10:26 AM IST

National Pizza Day 2024: ९ फेब्रुवारी हा राष्ट्रीय पिझ्झा दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हीही पिझ्झा प्रेमी असाल तर पिझ्झाची हेल्दी रेसिपी जाणून घ्या.

National Pizza Day special recipe
National Pizza Day special recipe (Unsplash)

how to make suji pizza: नॅशनल पिझ्झा डे २०२४ जो दरवर्षी ९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. पिझ्झाच्या सन्मानार्थ समर्पित केलेला प्रिय खाद्य दिवस आहे. हा आनंददायक उत्सव जगभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय पिझ्झा दिवस नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे शोधणे कठीण आहे. पण, काही लोकांचा असा विश्वास आहे की ते १० व्या शतकात इटलीतील नेपल्समध्ये याचा जन्म झाला आहे. तेव्हा आधुनिक पिझ्झासारखा दिसणारा डिश प्रथम सापडला. तर काही जण ते अमेरिकेशी जोडतात. याच निमित्ताने पिझ्झाची हेल्दी रेसिपी जाणून घेऊयात. ही रेसिपी रव्यापासून बनवू शकता. लहान मुलंही रवा पिझ्झा खूप आवडीने खाऊ शकतात. यामुळे तब्येतीची चिंताही राहणार नाही. चला जाणून घेऊया रवा पिझ्झा बनवण्याची सोपी पद्धत.

लागणारे साहित्य

बॅटरसाठी

रवा - १ कप

ताक - १ कप

बेकिंग सोडा - १/२ टीस्पून

मीठ - चवीनुसार

टॉपिंगसाठी

किसलेले मोझेरेला चीज - ५ टेस्पून

शिमला मिरची चिरलेली - १

टोमॅटो चिरलेले - २-३

कॉर्न - २ चमचे

चिरलेला ऑलिव्ह - २ टेस्पून

चिली फ्लेक्स - १/४ टीस्पून

मिक्स्ड हर्ब्स - १/४ टीस्पून

चिरलेला कांदा – २

पिझ्झा सॉससाठी

टोमॅटो सॉस - १/४ कप

चिली सॉस - १ टीस्पून

मिक्स्ड हर्ब्स - १/२ टीस्पून

चिली फ्लेक्स - १/२ टीस्पून

जाणून घ्या रेसिपी

रव्यापासून पिझ्झा तयार करण्यासाठी, प्रथम एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात रवा आणि थोडे मीठ घालून मिक्स करा. आता रव्यात एक कप ताक घालून मिक्स करा. ताकाऐवजी दहीही वापरता येते. आता भांड्यात अर्धा कप पाणी घालून द्रावण तयार करा. आता हे बॅटर १५ मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून रवा सर्व ओलावा शोषून घेईल.

आता पिझ्झा सॉस तयार करा आणि त्यासाठी एका बाउलमध्ये टोमॅटो सॉस, चिली सॉस, मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स टाका, चमच्याच्या मदतीने चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा. यानंतर, रवा पिठात घ्या आणि चमच्याने पुन्हा मिसळा. यानंतर, रव्याच्या पिठात एक चतुर्थांश कप पाणी घाला आणि आवश्यकतेनुसार बॅटरची जाडी कमी करा.

आता गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवा आणि मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाकून पसरवा. आता एका भांड्यात रवा बॅटर घेऊन तव्यावर ओता आणि गोल बेस तयार करा. लक्षात ठेवा की तव्यावर पसरलेला बेस जाड असावा. आता खालून रव्याचा बेस पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा. यानंतर, कडांवर एक चमचा तेल घालून ते पालटून घ्या.

थोडा वेळ शिजवल्यानंतर बेसवर पिझ्झा सॉस पसरवा. त्यावर किसलेले मोझेरेला चीज टाकून चांगले पसरवा. नंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, ऑलिव्ह, सिमला मिरची आणि कॉर्न दाणे घाला. आता या सर्व गोष्टींवर पुन्हा मोझारेला चीज टाका. वर चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स घाला. चीज व्यवस्थित मेल्ट झाल्यावर आणि पिझ्झा शिजला की गॅस बंद करून पिझ्झा प्लेटमध्ये काढून घ्या. आता पिझ्झाचे तुकडे करा आणि गरमागरम रवा पिझ्झाचा आस्वाद घ्या.

WhatsApp channel