मराठी बातम्या  /  Lifestyle  /  How To Make Sugar Free Badam Barfi And Phirni For Ganeshotav

Sugar-Free Sweets: गणेशोत्सवात बनवा या २ शुगर फ्री मिठाई, सोपी आहे रेसिपी

गणेशोत्सवासाठी शुगर फ्री मिठाई
गणेशोत्सवासाठी शुगर फ्री मिठाई
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Sep 19, 2023 07:19 PM IST

Recipe for Ganeshotsav: मधुमेही रुग्णांव्यतिरिक्त आजकाल फिटनेस फ्रीक देखील साखर खाणे टाळतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला २ शुगर फ्री मिठाईच्या रेसिपी सांगत आहोत, ज्या तुम्ही गणेशोत्सवात ट्राय करू शकता.

Sugar Free Mithai or Sweets Recipe: गणेश चतुर्थीला बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले आहे. दहा दिवस चालणाऱ्या सणाला भक्त गणपती बाप्पाला त्यांच्या आवडीचे पदार्थ अर्पण करून प्रसन्न करतात. सण-उत्सवाच्या निमित्ताने मधुमेही रुग्णांसाठी नॅचरल स्वीटनर वापरून घरच्या घरी मिठाई सहज बनवता येते. येथे आम्ही २ शुगर फ्री मिठाईच्या रेसिपी सांगत आहोत, ज्या तुम्ही देखील सहज ट्राय करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

शुगर फ्री फिरनी रेसिपी

फिरनी ही एक साधी तांदळाची खीर आहे, जी दूध हळूहळू उकळून बनते. जाणून घ्या बनवण्याची रेसिपी

साहित्य

- दूध

- तांदूळ

- छोटी वेलची

- आर्टिफिशियल स्वीटनर

- पिस्ता

- बदाम

- गुलाब इसेंस

कसे बनवायचे

हे बनवण्यासाठी तांदूळ गाळून घ्या आणि ब्लेंडरमध्ये थोडे दूध घालून चांगले ब्लेंड करा. आता एका पातेल्यात दूध उकळा. आता त्यात बारीक केलेले तांदूळ घाला आणि नीट उकळवा. मंद आचेवर शिजवताना अधून मधून ढवळत राहा. सुमारे २०-२५ मिनिटे शिजवा. शेवटी वेलची पावडर आणि स्वीटनर घाला. आता फिरनीमध्ये पिस्ता आणि गुलाबाचा इसेंस घाला. फिरनी तयार आहे.

शुगर फ्री बदाम बर्फी रेसिपी

बदाम बर्फी ही शुगर फ्री आणि हेल्दी मिठाई आहे. त्यात अक्रोड, अंजीर आणि बदाम यांसारखे नट्स टाकले जातात. ते कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या

साहित्य

- मावा

- बदाम

- सुका मेवा (अक्रोड, पिस्ता आणि अंजीर)

- वेलची पावडर

- जायफळ पावडर

बदाम बर्फी कशी बनवायची

एका पॅन किंवा कढईमध्ये मावा आणि बारीक केलेले बदाम मिक्स करा. हे नीट मिक्स करा आणि अधूनमधून ढवळत असताना मध्यम आचेवर ५ मिनिटे शिजवा. आता मिक्स केलेले काजू, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घाला. त्यांना चांगले मिक्स करा. आता एका प्लेटला तूप लावून तयार मिश्रण प्लेटवर चांगले पसरवा. थंड होण्यासाठी किमान ४ ते ५ तास असेच राहू द्या. नंतर व्यवस्थित सेट झाल्यावर त्याचे समान तुकडे करा. तुमची बदाम बर्फी तयार आहे.