Street Style Sandwich: तव्यावर बनवा स्ट्रीट स्टाईल सँडविच, खूप सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Street Style Sandwich: तव्यावर बनवा स्ट्रीट स्टाईल सँडविच, खूप सोपी आहे रेसिपी

Street Style Sandwich: तव्यावर बनवा स्ट्रीट स्टाईल सँडविच, खूप सोपी आहे रेसिपी

Published Feb 24, 2024 06:22 PM IST

Sandwich Recipe: बाजारात मिळणारे सँडविच घरी बनवणे कठीण वाटते असेल तर ही रेसिपी ट्राय करा. याने सोप्या पद्धतीने घरी स्ट्रीट स्टाईल सँडविच बनवता येतात.

स्ट्रीट स्टाईल सँडविच
स्ट्रीट स्टाईल सँडविच (freepik)

Street Style Sandwich Recipe: सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळचा स्नॅक्स टाईम दोन्ही वेळी सँडविच आवडीने खाल्ले जाते. बाजारात मिळणाऱ्या सँडविचची चव पूर्णपणे वेगळी असते. जे घरी कितीही केले तरी तयार करता येत नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर हे स्ट्रीट स्टाइल सँडविच बनवण्याची रेसिपी लक्षात ठेवा. विशेष म्हणजे सँडविच मेकरशिवाय पॅनवर किंवा तव्यावर स्ट्रीट स्टाईलचे सँडविच पटकन बनवता येतात. चला तर मग जाणून घ्या ही सोपी रेसिपी.

स्ट्रीट स्टाईल सँडविच बनवण्यासाठी साहित्य

- ४ ब्रेड

- बारीक चिरलेला कांदा

- बारीक चिरलेली शिमला मिरची

- बारीक चिरलेली पिवळी शिमला मिरची

- बारीक चिरलेली लाल शिमला मिरची

- स्वीट कॉर्न

- १०० ग्रॅम पनीर

- काळी मिरी पावडर

- चिली फ्लेक्स

- पिझ्झा सिजनिंग

- मेयोनीज

- मोझारेला चीज

- बटर

- मीठ चवीनुसार

स्ट्रीट स्टाइल सँडविच बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम सर्व ब्रेड एकत्र प्लेटमध्ये ठेवा. आता त्यावर मेयोनीज लावा. नंतर बारीक चिरलेला कांदा, पनीर, लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची घाला. तसेच स्वीट कॉर्न आणि पिझ्झा सिजनिंग घाला. चवीनुसार मीठ घालून त्यावर चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर घाला. आता वरून तंदुरी मेयोनीज घाला. आता दुसऱ्या ब्रेडने हे झाकून ठेवा. आता तव्यावर किंवा पॅनला बटरने ग्रीस करा. तयार सँडविच गरम तव्यावर ठेवा आणि सोनेरी होईपर्यंत एक ते दोन मिनिटे बेक करा. आता पॅनमधून काढून त्यावर पिझ्झा सॉस लावा आणि चीज घाला. तुम्ही यावर थोडे पिझ्झा सिजनिंग सुद्धा घालू शकता. आता हे सँडविच बटरने ग्रीस केलेल्या गरम पॅनवर अशा प्रकारे ठेवा की चीजचा भाग वर असेल. 

आता पॅनवर झाकण ठेवून एक मिनिट झाकून ठेवा. जेणेकरून सर्व चीज वितळेल. तुमचे टेस्टी स्ट्रीट स्टाईल सँडविच तयार आहे. त्याला कट करा आणि टोमॅटो सॉस, हिरव्या चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner