Street Style Pav Bhaji Recipe: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काहीतरी खास बनवण्याचा विचार असेल तर आणि डिनरमध्ये काही टेस्टी खायचे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. लहान मुले असो वा मोठे पावभाजी खायला सर्वांनाच आवडते. तुम्ही हे डिनरमध्ये तसेच नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. विशेष म्हणजे हे फक्त टेस्टी नाही तर यात बऱ्याच भाज्या असल्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा हेल्दी आहे. मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी घरी कशी बनवायची ते जाणून घ्या.
- १ कप चिरलेला कांदा
- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- १/२ कप फ्लावरचे तुकडे
- १/२ कप सिमला मिरची
- १ कप बटाटे तुकडे
- १/२ कप बीटरूट
- १/२ कप टोमॅटो प्युरी
- एक जुडी कोथिंबीर
- २ चमचे तेल
- ४ बटरचे तुकडे
- १ टीस्पून तिखट
- ३ टीस्पून पाव भाजी मसाला
- १ टीस्पून लाल तिखट
- १ तुकडा लोणी
- बटर
- पावभाजी मसाला
पावभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटा, फ्लावर, बीटरूट, वाटाणा हे कुकरमध्ये शिजवून घ्या. आता कढईत तेल आणि बटर घालून त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. यानंतर आले लसूण पेस्ट घालून मिक्स करा. आता त्यात टोमॅटो प्युरी घालून मिक्स करा. हे तेल सोडू लागले की त्यात शिमला मिरची घालून शिजवा. नंतर कुकरमध्ये शिजवलेल्या मिक्स भाज्या घाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात थोडे गाजर सुद्धा घालू शकता. आता हे सर्व मिक्स करून चांगले मॅश करुन घ्या. आता यात लाल तिखट, मीठ आणि पावभाजी मसाला घाला. भाजी शिजल्यावर त्यात शेवटी बटर आणि कोथिंबीर घाला. आता पाव भाजण्यासाठी तव्यावर बटर घाला आणि त्यावर पावभाजी मसाला शिंपडा. त्यावर पाव ठेवून भाजून घ्या. तुम्ही पावावर बटर आणि पावभाजी मसाला लावून सुद्धा भाजू शकता. पाव दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. आता गरमा गरम भाजीवर कांदा, लिंबू, टाकून पावसोबत सर्व्ह करा.