Moong Tikki Recipe: नाश्त्यात बनवा मोड आलेल्या मूग डाळीची टिक्की, टेस्ट सोबत हेल्थही देते ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Moong Tikki Recipe: नाश्त्यात बनवा मोड आलेल्या मूग डाळीची टिक्की, टेस्ट सोबत हेल्थही देते ही रेसिपी

Moong Tikki Recipe: नाश्त्यात बनवा मोड आलेल्या मूग डाळीची टिक्की, टेस्ट सोबत हेल्थही देते ही रेसिपी

Feb 21, 2024 08:59 AM IST

Healthy Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी काही हेल्दी पर्याय शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मोड आलेल्या मूग डाळीपासून तुम्ही टेस्टी टिक्की बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

मोड आलेल्या मूग डाळीची टिक्की
मोड आलेल्या मूग डाळीची टिक्की (freepik)

Sprouted Moong Dal Tikki Recipe: मोड आलेले मूग आरोग्यासाठी खूप फायदेशीर म्हटले जातात. यात प्रोटीनचे प्रमाण भरपूर असल्याने त्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मोड आलेल्या मूगाची उसळ तुम्ही अनेकदा खाल्ली असले. पण तुम्ही कधी याची टिक्की ट्राय केली आहे का? होय, मोड आलेल्या मूग डाळीपासून टेस्टी टिक्की बनवता येते. तुम्ही ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यात बनवू शकता. ही रेसिपी बनवायला सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या टेस्टी आणि हेल्दी मोड आलेल्या मूग डाळीची टिक्की कशी बनवयाची.

मोड आलेल्या मूग डाळीची टिक्की बनवण्यासाठी साहित्य

- एक कप मोड आलेली मूग डाळ

- एक उकडलेले रताळे किंवा बटाटा

- एक टेबलस्पून मैदा

- एक टेबलस्पून बेसन

- एक टेबलस्पून कॉर्न फ्लोअर

- अर्धा टेबलस्पून रवा

- एक चिरलेला कांदा

- दोन हिरवी मिरची चिरलेले

- एक टीस्पून किसलेले आले

- एक टीस्पून कोथिंबीर

- अर्धा टीस्पून ओवा

- एक टीस्पून लाल तिखट

- एक टीस्पून आमचूर पावडर

- अर्धा टीस्पून जिरे आणि धने पावडर

- चवीनुसार काळी मिरी

- तळण्यासाठी तेल

- चवीनुसार मीठ

मोड आलेल्या मूग डाळीची टिक्की बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम मोड आलेल्या मूगाची बारीक पेस्ट करा. हे बारीक करताना यात थोडे पाणी वापरा जेणेकरून पेस्ट गुळगुळीत होईल. जर तुम्हाला क्रिस्पी टिक्की हवी असेल तर याची जाडसर पेस्ट बनवा. जास्त बारीक करू नका. आता रताळे किंवा बटाटे सोलून मॅश करा. आता एका बाउलमध्ये सर्व मिश्रण, बारीक केलेले मूग, रताळे, मैदा, बेसन, कॉर्न फ्लोअर, रवा टाका. हे मिक्स केल्यावर यात तेल सोडून इतर सर्व मसाले टाका आणि नीट मिक्स करून घ्या. आता या पिठाचे तुमच्या आवडीच्या आकाराच्या टिक्की बनवा. आता कढईत तेल गरम करून त्यात या टिक्की तळून घ्या. कबाब दोन्ही बाजूंनी बाउन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळा. तुमचे टेस्टी आणि हेल्दी टिक्की तयार आहे. गरमा गरम टिक्की सर्व्ह करा.

Whats_app_banner