Spicy Fried Rice Recipe: बहुतेक घरांमध्ये भात दररोज बनविला जातो. कधी कधी तो जास्त बनतो. अशा वेळी उरलेला भात खायला कुणालाच आवडत नाही. दुपारच्या जेवणात भात उरला तर संध्याकाळी या उरलेल्या भाताला बहुतेक जण कांदा, टोमॅटो घालून फोडणी देतात आणि रात्रीच्या जेवणात खातात. तुमच्या घरी पण भात उरला असेल आणि तोच नेहमीचा फोडणीचा भात खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी या उरलेल्या भातापासून स्पायसी फ्राईड राईस बनवा. हे बनवणे खूप सोपे आहे आणि पटकन तयार होते. विशेष म्हणजे मुलं देखील हे खूप आवडीने खातील. चला तर मग जाणून घ्या याची रेसिपी.
- २ कप उरलेला भात
- ३ चमचे तेल
- १ चमचा बारीक चिरलेला लसूण
- अर्धा चमचा बारीक चिरलेले आले
- अर्धा कप बारीक चिरलेली कोबी
- अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची
- १ चमचा चिरलेल्या हिरवा कांद्याचा पांढरा भाग
- २ चमचे बारीक चिरलेले फ्रेंच बीन्स
- २ चमचे बारीक चिरलेले गाजर
- २ चमचे हिरव्या कांद्याची पाने
- १ कप पनीर कापलेले
- १ टेबलस्पून सोया सॉस
- १ टीस्पून व्हिनेगर
- अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर
- मीठ
उरलेल्या भातापासून स्पायसी फ्राईड राईस बनवण्यासाठी प्रथम कढईत तेल गरम करा. नंतर प्रथम चक्रफूल घाला आणि काही सेकंद किंवा तेलाचा सुगंध येईपर्यंत परतून घ्या. आता त्यात लसूण, आलं घालून काही सेकंद परतून घ्या. लसूण तपकिरी करण्याची गरज नाही. नंतर त्यात हिरव्या कांद्याचा पांढरा भाग घालून सुमारे २ मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेले फ्रेंच बीन्स घाला. हे मिक्स करताना भाजून घ्या. नंतर त्यात पनीर आणि इतर बारीक चिरलेल्या भाज्या घाला. सर्व भाज्या चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी गॅसची फ्लेम वाढवा. भाज्या सतत ढवळत राहा. भाज्यांचा कुरकुरीतपणा टिकवून ठेवण्यासाठी ते हाय फ्लेमवरच भाजल्या जातात.
नंतर त्यात सोया सॉस, मीठ आणि मिरपूड घाला. त्यात भात घाला, वेगाने ढवळा. भातावर सॉस चांगला कोट होईपर्यंत ढवळत काही मिनिटे परतून घ्या. सर्व काही चांगले मिक्स झाल्यावर हिरव्या कांद्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करावे.