Sooji or Rava Bread Toast Recipe: जर तुम्हाला नाश्त्यात काही चटपटीत आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही रवा ब्रेड टोस्टची ही टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता. रवा ब्रेड टोस्ट ही एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपी काही मिनिटात तयार होते. ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला चविष्ट आहे. चला तर जाणून घेऊया रवा ब्रेड टोस्ट कसा बनवायचा.
- रवा १ कप
- ब्रेड
- दही १ कप
- कांदा १
- टोमॅटो १
- हिरवी मिरची २
- कोथिंबीर
- चिली फ्लेक्स
- पाणी
- मीठ
- तेल २ चमचे
- मोहरी १ चमचा
- कढीपत्ता
रवा ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात रवा, दही, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, चिरलेली हिरवी मिरची, मीठ, चिरलेली कोथिंबीर, पाणी घालून सर्व काही नीट मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करा. आता ही तयार पेस्ट ब्रेडच्या स्लाइसवर लावा आणि वर चिरलेला टोमॅटो आणि चिली फ्लेक्स घाला. यानंतर टोस्टसाठी तडका बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. या तेलात मोहरी आणि कढीपत्ता टाकल्यानंतर त्यात ब्रेड घाला. आता ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला पेस्ट लावा आणि काही वेळाने पलटवून चांगले बेक करा. तुमचे टेस्टी रवा ब्रेड टोस्ट सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे.