मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sooji Cheela Recipe: नाश्त्यात बनवा चविष्ट, हेल्दी रवा चीला! होतो झटपट तयार

Sooji Cheela Recipe: नाश्त्यात बनवा चविष्ट, हेल्दी रवा चीला! होतो झटपट तयार

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 27, 2023 09:15 AM IST

Breakfast Recipe: तुम्ही अनेक वेळा बेसनाचा चीला बनवून खाल्ला असेल. पण यावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये, तुम्ही बेसनाच्या पीठाऐवजी रव्याचा चीला बनवून पाहू शकता.

हेल्दी रवा चीला
हेल्दी रवा चीला (Freepik )

Healthy Breakfast Recipe: अनेकवेळा वीकेंड नंतरच्या दिवसाची सुरुवात त्याच त्याच रेगुलर नाश्त्यापेक्षा काहीतरी नवीन खावंसं वाटत. अश्या पदार्थाच्या शोधात सगळेच असतात जे चविष्ट आणि हेल्दी असतील. यासाठीच आम्ही घेऊन आलोय रवा चीलाची रेसिपी. तुम्ही अनेक वेळा बेसनाचा चीला बनवून खाल्ला असेल. पण यावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये, तुम्ही बेसनाच्या पीठाऐवजी रव्याचा चीला बनवून पाहू शकता. ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे, जी सकाळच्या प्रत्येकासाठी सर्वोत्तम खाद्यपदार्थ असू शकते. रवा चीला बनवण्यासाठी दह्यासोबत काही भाज्याही लागतील. चला जाणून घेऊया, राव चीला बनवण्यासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत आणि त्याची पद्धत काय आहे.

रवा चीला बनवण्यासाठी साहित्य

रवा - १ कप

कांदा - एक

टोमॅटो - १

गाजर - १

सिमला मिरची - १

दही - अर्धा कप

हिरवी मिरची - १-२

लसूण-आले पेस्ट - १ टीस्पून

कोथिंबीरची पाने - बारीक चिरून

मीठ - चवीनुसार

तेल - आवश्यकतेनुसार

लाल तिखट - १ टीस्पून

पाणी - आवश्यकतेनुसार

रवा चीला कसा बनवायचा?

सर्व प्रथम कांदा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची इत्यादी सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. आता एका भांड्यात रवा टाका. त्यात दही घालून चांगले फेटून घ्या. रव्याचे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे. त्यानुसार त्यात दही आणि पाणी घाला. आता सर्व चिरलेल्या भाज्या घाला आणि चांगले मिसळा. जर मिश्रण घट्ट झाले तर आपण थोडे अधिक पाणी घालू शकता. आता त्यात लाल तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट घालून ढवळा आणि १५ मिनिटे राहू द्या.

यामुळे चीला मऊ होईल. आता गॅसवर पॅन ठेवा, त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यावर रव्याचे पीठ घाला आणि चांगले पसरवा. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. एका प्लेटमध्ये काढा. त्याचप्रमाणे हे सर्व भाजून घ्या. रव्याचा चविष्ट चीला तयार आहे. नाश्त्यात टोमॅटो सॉस किंवा कोथिंबीरीच्या चटणीसोबत खाण्याचा आनंद घ्या.

WhatsApp channel

विभाग