Palak Sabji: नेहमीच्या पालकाच्या भाजीला द्या सिंधी स्टाईल तडका, सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Palak Sabji: नेहमीच्या पालकाच्या भाजीला द्या सिंधी स्टाईल तडका, सोपी आहे रेसिपी

Palak Sabji: नेहमीच्या पालकाच्या भाजीला द्या सिंधी स्टाईल तडका, सोपी आहे रेसिपी

Jan 19, 2024 01:46 PM IST

Spinach Sabji: लहान मुले असो वा मोठे पालकाची भाजी म्हटलं की सगळे नाक तोंड एक करतात. तुम्ही नेहमीच्या साध्या पालकाच्या भाजीला सिंधी स्टाईल तडका देऊन ती आणखी टेस्टी बनवू शकता.

पालक भाजी
पालक भाजी

Sindhi Style Palak Sabji Recipe: पालक ही पौष्टिकतेने समृद्ध असलेली पालेभाजी आहे. पण ते खाताना लहान मुलेच नाही तर मोठे सुद्धा खायचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत पालक खाऊ घालणे हे मोठे काम वाटते. वास्तविक आहारात पालकाचा समावेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. पण ही सिंधी स्टाइल पालक भाजी बनवली तर प्रत्येक जण आवडीने खाणार. ही एक स्वादिष्ट पालक डिश आहे जी काही मिनिटांत तयार केली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया सिंधी स्टाईलने पालकाची भाजी कशी बनवायची.

सिंधी स्टाईल पालक भाजी बनवण्यासाठी साहित्य

- अर्धा किलो पालक

- बेसन

- २ कांदे बारीक चिरून

- ४-५ टोमॅटोची पेस्ट

- १०- १२ लसूण बारीक चिरून

- २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून

- १ चमचा धने पावडर

- काश्मिरी लाल मिरची पावडर

- गरम मसाला

- जिरे पावडर

- चवीनुसार मीठ

सिंधी स्टाइल पालकाची भाजी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम पालकाची पाने नीट धुवून बारीक चिरून घ्या. लसूण सोलून बारीक चिरून घ्या. त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि कांदे बारीक चिरून बाजूला ठेवा. टोमॅटोची पेस्ट बनवून बाजूला ठेवा. आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर लसूण परतून घ्या. लसूण भाजल्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि कांदा घालून परता. कांदा चांगला भाजल्यावर त्यात बारीक चिरलेली पालकाची पाने घालून शिजवा. पालकाची पाने शिजायला लागल्यावर त्यात टोमॅटोची पेस्ट टाकून परतावे. दोन मिनिटे झाकून ठेवा. एका भांड्यात बेसन घेऊन त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. टोमॅटो शिजल्यानंतर हे बेसनाचे बॅटर त्यात घाला. तसेच धणेपूड, जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, काश्मिरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. हाय फ्लेमवर चांगले शिजवा. तुमची सिंधी स्टाईल पालकाची भाजी रेडी आहे.

Whats_app_banner