मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Homemade Face Pack: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची चिंता सोडा, ट्राय करा 'हे' सिंपल फेसपॅक

Homemade Face Pack: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची चिंता सोडा, ट्राय करा 'हे' सिंपल फेसपॅक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 24, 2023 01:41 PM IST

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात ड्राय स्किनची समस्या वाढते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही फेस पॅक लावू शकता. हे सर्व पॅक त्वचेतील कोरडेपणा दूर करून त्वचा स्मूथ करतात.

कोरड्या त्वचेची समस्या सोडवण्यासाठी फेसपॅक
कोरड्या त्वचेची समस्या सोडवण्यासाठी फेसपॅक

Face Pack for Dry Skin: हिवाळा हा ऋतू खूप आरामदायी असला तरी तो तुमच्या त्वचेसाठी अनेक समस्या घेऊन येतो. विशेषत: या हंगामात त्वचा कोरडी होते. कोरडी आणि थंड हवा तुमची त्वचेवर खवले आणि क्रॅक बनवू शकते. यापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. शिवाय स्किन केअर सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी फेस पॅक हा एक चांगला मार्ग आहे. येथे आम्ही सोप्या पद्धतीने फेस पॅक कसे बनवायचा ते सांगत आहोत.

कोरड्या त्वचेसाठी फेस पॅक कसा बनवायचा

१) मध आणि गुलाब जल

मध आणि गुलाब पाणी दोन्ही त्वचेच्या दुरुस्तीसाठी चांगले आहेत. हिवाळ्यात त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यासाठी या दोन गोष्टी उत्तम आहेत. हे करण्यासाठी १ चमचा मध घ्या आणि नंतर त्यात १ चमचा गुलाब जल घाला. दोन्ही एकत्र मिक्स करा. नंतर चेहरा आणि मानेवर समान रीतीने लावा. १० मिनिटे राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ करा. बेस्ट रिझल्टसाठी हे रोज वापरा.

२) मध आणि साय

मध नैसर्गिक हायड्रेटर म्हणून काम करते. यासोबतच दुधाची साय निस्तेज आणि कोरडी त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करते. ते बनवण्यासाठी साय आणि मध समान प्रमाणात घ्या आणि दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. नंतर ते चेहऱ्यावर आणि मानेला चांगले लावा. सुमारे २५ मिनिटे ते राहू द्या आणि नंतर ते धुवा. बेस्ट रिझल्टसाठी हे रोज वापरा.

३) नारळाने फेस पॅक बनवा

नारळापासून बनवलेला फेस पॅक पौष्टिक तर आहेच पण ते मुरुमांसारख्या त्रासदायक समस्यांना तोंड देण्यासाठी मदत करतो. ते बनवण्यासाठी किसलेले खोबरे घ्या आणि घट्ट पेस्ट होईपर्यंत ब्लेंड करा. तुम्ही त्यात थोडे पाणी घालू शकता.

ही पेस्ट सुमारे २० मिनिटे आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. बेस्ट रिझल्टसाठी हे रोज वापरा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग