Shingada Sheera Recipe: शिंगाड्याचा शिरा बनवण्याची ही आहे सोपी पद्धत, झटपट होतो तयार
Singhare ka Halwa: हरतालिकेच्या उपवासासाठी गोड बनवण्याचा विचार करत असाल तर झटपट शिंगाड्याच्या पीठापासून शिरा बनवा. टेस्टी आणि हेल्दी शिरा बनवण्यासाठी ही ट्रिक फॉलो करा.
Shingada cha Sheera Recipe: बहुतांश महिला हरतालिकेच्या उपवासाला तिखट, मीठ खात नाही. ते फळे आणि गोड पदार्थ खाऊन उपवास करतात. तुम्हाला सुद्धा उपवासात काही गोड बनवायचे असेल तर तुम्ही शिंगाड्याच्या पीठाचा हलवा बनवू शकता. साधारणपणे शिंगाड्याचा शिरा बनवायला वेळ लागतो आणि थोड्याशा निष्काळजीपणामुळे त्यात गुठळ्या होतात. त्यामुळे हलव्याची चव खराब होते. जर तुम्हाला शिंगाड्याचा पीठाचा शिरा बनवायला अवघड जात असेल किंवा तुम्ही साखरेमुळे ते टाळत असाल तर यावेळी शिंगाड्याच्या शिऱ्याची ही रेसिपी ट्राय करा. हे बनवायला सोपे तर आहेच पण ते लवकर सुद्धा तयार होते. चला तर मग जाणून घेऊया शिंगाड्याचा शिरा कसा बनवायचा.
ट्रेंडिंग न्यूज
शिंगाड्याचा शिरा बनवण्यासाठी साहित्य
- एक कप शिंगाड्याचे पीठ
- एक कप गूळाची पावडर
- एक टीस्पून वेलची पावडर
- अर्धी वाटी देशी तूप
- आवश्यकतेनुसार पाणी
शिंगाड्याचा शिरा बनवण्याची पद्धत
शिंगाड्याचा शिरा बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये तीन कप पाणी घाला आणि गरम करा. ते गरम झाल्यावर त्यात गूळाची पावडर किंवा गूळ घाला. ते चांगले विरघळू द्या आणि थोडे शिजवा. आता त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवा. आता कढईत तूप घालून शिंगाड्याचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या. देशी तुपाचे प्रमाण पुरेसे असल्यास पीठ लवकर भाजते. भाजून सोनेरी झाल्यावर त्यात हवे असेल ते काजू, बदाम आणि ड्रायफ्रुट्स टाका. हे सर्व चांगले भाजून झाल्यावर त्यात गुळाचे पाणी घालून मोठ्या आचेवर फास्ट ढवळा. जेणेकरून हलव्यात गुठळ्या तयार होणार नाहीत. हाय फ्लेमवर यातील पाणी सुकेपर्यंत शिजवा. शेवटी वेलची पूड घालून मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास ते प्लेटमध्ये सेट करून शकता किंवा बाऊलमध्ये गरमा गरम सर्व्ह करा.
विभाग