Shikanji Recipe: शिकंजी बनवण्याची ही पद्धत नवीन आहे, माधुरी दीक्षितच्या पतीने शेअर केली रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shikanji Recipe: शिकंजी बनवण्याची ही पद्धत नवीन आहे, माधुरी दीक्षितच्या पतीने शेअर केली रेसिपी

Shikanji Recipe: शिकंजी बनवण्याची ही पद्धत नवीन आहे, माधुरी दीक्षितच्या पतीने शेअर केली रेसिपी

May 24, 2024 11:43 PM IST

Madhuri Dixit Husband's Recipe: शिकंजी किंवा लिंबू सरबत बनवण्याची ही पद्धत इतर रेसिपीपेक्षा थोडी वेगळी आणि हेल्दी आहे. चला जाणून घ्या डॉ. श्रीराम नेने यांनी शेअर केलेली शिकंजीची रेसिपी.

डॉ. श्रीराम नेने यांनी शेअर केलेली शिकंजीची रेसिपी
डॉ. श्रीराम नेने यांनी शेअर केलेली शिकंजीची रेसिपी

Shikanji Recipe Shared By Dr. Shriram Nene: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हेल्थ एक्सपोर्ट लोकांना त्यांच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी शिकंजी, नारळ पाणी, ताक, लस्सी यासारख्या थंड पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देत आहेत. वाढत्या उष्णता आणि उन्हामुळे स्नायू दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उष्माघात, गरमीमुळे थकवा आणि हायपरथर्मिया यासारख्या समस्या निर्माण होऊन व्यक्ती आजारी होऊ शकते. तुम्हाला या समस्यांपासून दूर राहायचे असेल, तर तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या शरीराला ताजेतवाने आणि थंडावा देण्यासाठी शिकंजीची ही नवीन रेसिपी करून पाहू शकता.

शिकंजी किंवा लिंबू सरबतच्या या रेसिपीची विशेषता म्हणजे ती बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. शिकंजी बनवण्याची ही पद्धत इतर शिकंजी रेसिपीपेक्षा थोडी वेगळी आणि आरोग्यदायी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया कशी बनवली जाते ही चविष्ट शिकंजीची रेसिपी.

शिंकीजी बनवण्याची पद्धत

डॉ.श्रीराम नेने यांनी इंस्टाग्रामवर उन्हाळी स्पेशल पोस्ट करून लिंबू पाण्याची किंवा शिकंजीची रेसिपी शेअर केली आहे. ही शिकंजी रेसिपी शेअर करताना त्यांनी ती बनवण्याची अतिशय सोपी आणि आरोग्यदायी पद्धत सांगितली आहे. शिकंजी बनवण्यापूर्वी प्रथम दोन चमचे चिया सीड्स पाण्यात भिजवून बाजूला ठेवा. यानंतर मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास थंड पाणी टाका आणि त्यात अर्धा चिरलेला लिंबाचा रस पिळून घ्या. आता आधी भिजवलेले चिया सीड्स चमच्याच्या मदतीने मिक्सरच्या भांड्यात टाका. आता हे २० ते ३० सेकंद ब्लेंड करा.

तुमची चविष्ट शिकंजी तयार आहे. तुम्ही एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून वर शिकंजी टाकून सर्व्ह करू शकता. या शिकंजीची चव वाढवायची असेल तर त्यात काळे मीठ, साखर आणि पुदिन्याची पानेही वापरू शकता.

Whats_app_banner