मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shahi Tukda Recipe: रमजानमध्ये इफ्तार पार्टीसाठी बनवा शाही तुकडा, जाणून घ्या रेसिपी!

Shahi Tukda Recipe: रमजानमध्ये इफ्तार पार्टीसाठी बनवा शाही तुकडा, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 12, 2024 12:42 PM IST

Ramadan Special Recipe: रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. अशावेळी इफ्तार पार्टीसाठी तुम्ही घरच्या घरी चविष्ट शाही तुकडा बनवू शकता.

how to make shahi tukda
how to make shahi tukda (freepik)

Iftar Recipe: रमजानचा महिना सुरू झाला आहे. यावेळी आवर्जून रोज संध्याकाळी इफ्तार पार्टी केली जाते. यासाठी अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. इफ्तार पार्टीत काहीतरी गोड खावेसे वाटते. अशावेळी रेगुलर पेक्षा काही तरी टेस्टी आणि हटके खावंसं वाटतं. तुम्हालाही असेच वाटत असेल तर चविष्ट शाही तुकडा बनवून खा. ब्रेडपासून बनवलेला शाही तुकडा खायला खूप कुरकुरीत लागतो. याची रेसिपी अवघड वाटत असली तरी ही रेसिपी बनवणे अगदी सोपी आहे. विशेष म्हणजे शाही तुकडा बनवल्यानंतर तुम्ही तो बराच काळ स्टोअर ठेवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच शाही तुकड्याची चव आवडते. बाजारात उपलब्ध असलेल्या शाही तुकड्यापेक्षा घरगुती बनवलेला शाही तुकडा अधिक चविष्ट असतो. जाणून घ्या शाही तुकड्याची सोपी रेसिपी.

जाणून घ्या सोपी रेसिपी

> शाही तुकडा बनवण्यासाठी तुम्हाला मोठ्या आकाराचा पांढरा ब्रेड लागेल.

> साखरेचे पातळ सिरप तयार करा.

> सिरपमध्ये घालण्यासाठी तुम्हाला काही बारीक चिरलेली ड्रायफ्रुट्स, वेलची आणि मिल्कमेडची आवश्यकता असेल.

> शाही तुकडा बनवण्यासाठी प्रथम ब्रेडच्या कडा कापून घ्या आणि पांढरा ब्रेड तुमच्या आवडत्या आकारात कापून घ्या.

> त्रिकोणी शाही तुकडा अधिक चांगला दिसतो, म्हणून ब्रेड त्रिकोणाच्या आकारात कापून घ्या.

> एका कढईत रिफाइंड तेल किंवा देशी तूप घेऊन ते मोठ्या आचेवर गरम करा.

Dry Chicken Recipes: जेवणासाठी आवर्जून ट्राय करा ड्राय चिकनच्या या खास रेसिपी!

> तेल गरम झाल्यावर ब्रेड घालून सोनेरी होईपर्यंत तळा.

> एका पातेल्यात साखर आणि पाणी टाकून सिरप तयार करा.

> सिरपमध्ये थोडी वेलची मिसळा आणि सिरप थंड होऊ द्या.

> सर्व ब्रेड तेलात तळून टिश्यू पेपरवर बाजूला ठेवा.

> ब्रेड थंड झाल्यावर सिरपमध्ये टाका आणि थोड्या वेळाने बाहेर काढा.

> सर्व शाही तुकडे सिरपमध्ये बुडवा आणि एका मोठ्या प्लेटमध्ये काढा.

Mock Chicken Tikka: विराट कोहलीने चाखलेली ही डिश चिकन असूनही आहे व्हेज! जाणून घ्या सविस्तर

> आता शाही तुकड्यावर मिल्कमेड घाला आणि त्यात चिरलेला ड्रायफ्रुट्स घाला.

> थोडावेळ सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर शाही तुकडा सर्व्ह करा.

> जर तुमच्याकडे मिल्क मेड नसेल तर तुम्ही रबडी बनवून शाही तुकड्यावर लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel