Holi 2024: चविष्ट आणि कुरकुरीत 'साबुदाणा पापड' घरीच बनवा, जाणून घ्या सोपी रेसिपी!-how to make sabudana papad know recipe for holi ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi 2024: चविष्ट आणि कुरकुरीत 'साबुदाणा पापड' घरीच बनवा, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Holi 2024: चविष्ट आणि कुरकुरीत 'साबुदाणा पापड' घरीच बनवा, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Mar 18, 2024 08:54 PM IST

Sabudana Papad Recipe: होळीच्या सणाआधी घरीच सोप्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट साबुदाण्याचे पापड.

how to make sabudana papad
how to make sabudana papad (freepik)

How to make Sabudana Papad at Home: होळीचा सण म्हणजे रंगाची उधळण, वेगवगेळे पदार्थ खाण्याची चंगळ असते. यंदाचा होळीचा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसे घरातील महिला विविध प्रकारचे पदार्थ बनवू लागतात. यावेळी अनेक मिठाई बनवल्या जातात. याशिवाय वेगेवगेळ्या प्रकारचे खारट, तिखट पदार्थही बनवले जातात. या सणाच्या वेळी उन्हाळा सुरु होतो. या उन्हाचा फायदा घेऊन काही महिला बटाटा, भात, साबुदाणा पापड यासह पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ तुम्ही घरीच बनवू शकता. हे तुम्हाला बाजारात सहज मिळतील. पण, घरी बनवलेल्या पापडांना वेगळीच चव असते.विशेषत: घरी बनवलेले साबुदाण्याचे पापड खूप चविष्ट असतात. या पापडांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बनवायला सोपे आहेत आणि ते बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आवश्यक असते.

लागणारे साहित्य

२ कप साबुदाणा

१० कप पाणी

२ चमचे जिरे

१ टीस्पून लाल मिरची

चवीनुसार मीठ

Dahi Bhalla Recipe: होळीच्या दिवशी बनवा मऊ दहीभल्ला! जाणून घ्या रेसिपी

जाणून घ्या कृती

> साबुदाणा पापड बनवण्यासाठी लहान दाण्याचा साबुदाणा घ्यावा. हे चांगले धुऊन २ ते ३ तास ​​पाण्यात भिजत ठेवावे.

> असे केल्यानंतर जाड तळाच्या भांड्यात १० कप पाणी टाकून साबुदाणा उकळावा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात मीठ, जिरे आणि लाल मिरची टाका.

> विशेष काळजी घ्या की साबुदाणा सतत ढवळत राहा. असे केल्याने साबुदाणा भांड्याला चिकटणार नाही. साबुदाणा घट्ट आणि पारदर्शक होईपर्यंत शिजवा.

Kabab Recipe: ही कबाब रेसिपी आहे आरोग्यदायी, आवर्जून बनवा नाश्त्यासाठी!

> द्रावण तयार झाल्यावर स्वच्छ पॉलिथिन उन्हात पसरवा. आता या पॉलिथिनवर साबुदाण्याचे गरम द्रावण टाका. गोल पापड बनवून पॉलिथिनमध्ये टाका.

> लक्षात ठेवा की एक पापड दुसऱ्यापासून काही अंतरावर असावा. जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि सहजपणे वाळले जाऊ शकतात.

> ४ तासांनी पापड उलटे करा. जेणेकरून ते पॉलिथिनला पूर्णपणे चिकटणार नाही आणि उलटल्यावर तुटणार नाही. पापड दोन्ही बाजूंनी सुकल्यावर २ ते ३ दिवस रोज उन्हात ठेवा.

> यानंतर तुम्हाला पापड एका कंटेनरमध्ये ठेवावा लागेल ज्यामध्ये हवेचा संपर्क नसेल. हे पापड तळून तुम्ही हवे तेव्हा खाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग