Rosemary Hair Oil Mask: आपले केस दाट आणि मजबूत असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण हल्ली वाढते प्रदूषण, अन्नातील पोषक तत्वांची कमतरता आणि केसांवर रसायनांचा वापर यामुळे केस गळायला सुरुवात होते. जर तुम्हीही वाढत्या केस गळतीमुळे त्रस्त असाल आणि या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आणि महागडे ट्रीटमेंट करून पाहिले असतील तर आता रोझमेरी ऑइल हेअर मास्क तुम्हाला मदत करू शकतो.
रोझमेरी ऑइल मास्क केसांच्या फोलिकल्सला उत्तेजन देण्यास, केसांच्या वाढीस प्रोत्साहित करण्यास आणि केस गळती रोखण्यास मदत करते. तुम्हाला सुद्धा तुमचे केस दाट आणि मजबूत बनवायचे असतील तर घरी रोझमेरी ऑईल हेअर मास्क तयार करा. जाणून घ्या हे कसे बनवायचे.
रोझमेरी ऑइल बनाना हेअर मास्क केसांना मजबूत, सॉफ्ट आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये केळी, एक चमचा मध आणि दोन चमचे ओट्स, दोन चमचे रोझमेरी टी आणि ५ थेंब लॅव्हेंडर आणि एसेंशियल ऑईल मिक्स करा. सर्व काही एकत्र करून मास्क तयार करा. आता हा मास्क केसांना लावा आणि २० मिनिटे राहू द्या. २० मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने धुवून टाका.
रोझमेरी तेल आणि मेथी हेअर मास्क तयार करण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये दोन चमचे मेथी पावडर, ३ चमचे एलोवेरा जेल आणि ८ थेंब इसेंशियल ऑइल मिसळून हे केसांना लावा. साधारण २० मिनिटे राहू द्या. नंतर माइल्ड शॅम्पूने आपले केस धुवा. या मास्कमध्ये असणारी मेथी केसांची मुळे मजबूत करून दाट ठेवण्यास मदत करू शकते.
एलोवेरा रोझमेरी ऑईल हेअर मास्क तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे खोबरेल तेल आणि २ ते ३ चमचे एलोवेरा जेल, ५-६ थेंब रोजमेरी ऑईल मिसळून हेअर मास्क तयार करावा. हा हेअर मास्क केसांना २० मिनिटे लावा. हे केस मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)