मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rice Chilla Recipe: बेसनाच्या नाही तर तांदळाच्या पिठाने बनवा चीला! पाहा रेसिपीचा Video

Rice Chilla Recipe: बेसनाच्या नाही तर तांदळाच्या पिठाने बनवा चीला! पाहा रेसिपीचा Video

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 07, 2023 02:27 PM IST

Breakfast Recipe: बेसन किंवा रव्याचा चीला खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यासाठी तांदळाच्या पिठाचा चीला बनवा.

हेल्दी रेसिपी
हेल्दी रेसिपी (Freepik )

बर्‍याच वेळा नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. नाश्त्यात झटपट काहीतरी बनवायचे असेल तर चीला हा उत्तम पर्याय आहे. इतर चीला रेसिपीप्रमाणेच तांदळाच्या पिठाचा चीला देखील बनवायला सोपा आहे. तांदळाच्या पिठाच्या चीलाची रेसिपी इंस्टाग्राम वापरकरता gharkakhana97 ने शेअर केली आहे. या इंस्टाग्राम व्हिडीओवरून तांदळाच्या पिठाचा चीला बनवण्याची झटपट रेसिपी जाणून घेऊया.

तांदळाच्या पिठाचा चीला बनवण्याचे साहित्य

तांदूळ - १ कप

कांदा - १ लहान वाटी

हिरवी मिरची - २

पाणी - २ कप

कोथिंबीर पाने - १ टेस्पून

मीठ - चवीनुसार

तेल - १ टेस्पून

तांदळाच्या पिठाचा चीला कसा बनवायचा?

नाश्त्यासाठी तांदळाच्या पिठाचा चिल्ला बनवायचा असेल तर रात्री तयारी करावी लागेल. सर्व प्रथम तांदूळ पाण्याने स्वच्छ करा. रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आता सकाळी पाणी काढून टाका आणि तांदूळ मिक्सरमध्ये टाका आणि चांगले बारीक करा. ही पेस्ट एका भांड्यात काढा. आता त्यात २ कप कोमट पाणी घालून चांगले मिक्स करा.

आता कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. त्यांना पिठाच्या द्रावणात ठेवा आणि मिक्स करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात टोमॅटो, गाजर, सिमला मिरची इत्यादी बारीक चिरून इतर काही भाज्या टाकू शकता. आता त्यात मीठ पण टाका. पीठ जास्त पातळ करू नका. गॅसवर तवा ठेवा आणि त्यात तेल टाका. चांगले गरम झाल्यावर त्यात तांदळाच्या पिठाचे मिश्रण टाकून पसरवा. दोन्ही बाजूंनी आलटून पालटून भाजून घ्या. झाकण ठेवून मध्यम आचेवर एक मिनिट शिजवा. तांदळाच्या पिठाचा मऊ, मऊ, चविष्ट चीला तयार आहे. नाश्त्यात टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel