Restaurant Style Tomato Soup Recipe: अनेक वेळा रात्रीच्या जेवणात लोकांना सूप प्यायला आवडते. त्यातही टोमॅटो सूप हे बहुतांश लोकांचे आवडीचे असते. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर टोमॅटो सूप ऑर्डर केल्या जाते. पण रेस्टॉरंट सारखे सूप घरी बनत नाही अशी तक्रार अनेक महिला करतात. तुम्हाला सुद्धा रेस्टॉरंट सारखे सूप घरी बनत नाही असे वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप घरीच बनवू शकता. विशेष म्हणजे ही रेसिपी झटपट तयार होते. हे सूप मोठ्यांसोबतच लहान मुलांना देखील आवडेल. चला तर मग जाणून घ्या घरी रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप कसे बनवावे.
- ३-४ टोमॅटो
- ३-४ लसूण पाकळ्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- १ टीस्पून बटर
- काळी मिरी
- मीठ चवीनुसार
- ब्रेड
रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप बनवण्यासाठी प्रथम टोमॅटोचे चार तुकडे करा. लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे एकत्र सोलून धुवा. आता एका पॅनमध्ये एक चमचा किंवा दोन चमचे बटर घाला. आता त्यात लसूण, आले सोबत टोमॅटोचे तुकडे टाका. झाकण ठेवून हे टोमॅटो मंद आचेवर शिजू द्या. ते शिजल्यावर तळाला चिकटून मंद सुवास येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करून थोडा वेळ झाकून ठेवा आणि टोमॅटो पूर्णपणे शिजू द्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात गाजर किंवा पालक सुद्धा टाकू शकता. हे आणखी टेस्टी होईल. टोमॅटो थंड झाल्यानंतर टोमॅटोची साल काढून मिक्सर जारमध्ये टाका. सोबत लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे टाका. जर तुम्हाला गाजर, पालक अशा इतर काही भाज्या घालायच्या असतील तर त्याही उकळा. आता सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. जर ही पेस्ट घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घाला. आता गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या.
तुम्हाला एकदम स्मूद सूप मिळेल. त्यात थोडी साखर घाला. त्यासोबत मीठ आणि मिरपूड घालून चांगले मिक्स करा. तुमचे टेस्टी टोमॅटो सूप तयार आहे. तुम्ही याोसबत ब्रेडचे क्रॉउटन्स सर्व्ह करू शकता. यासाठी शिळी ब्रेडचे तुकडे तेलात तळून घ्या.
संबंधित बातम्या