Restaurant Style Spring Roll Recipe: लहान मुले असो किंवा मोठे प्रत्येकाला संध्याकाळी काहीतरी टेस्टी स्नॅक्स हवे असते. संध्याकाळी काही चटपटीत नाश्ता खावासा वाटतो. मात्र महिलांना रोज काहीतरी नवीन खाण्याची मागणी पूर्ण करणे कठीण असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक रेसिपी सांगत आहोत, जे तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्स टाइममध्ये सहज बनवू शकता. हा पदार्थ म्हणजे स्प्रिंग रोल. लोक अनेकदा रेस्टॉरंटमध्ये हे ऑर्डर करतात. पण अनेकांना ते घरी बनवणे कठिण वाटते. मात्र ही रेसिपी फॉलो करून तुम्ही घरी रेस्टॉरंटसारखे स्प्रिंग रोल बनवू शकता. जाणून घ्या याची रेसिपी.
- अर्धा कप मैदा
- १/४ कप दूध
- ३ टेबलस्पून तेल आणि पाणी एकत्र मिक्स करून
- अर्धा चमचा बेकिंग सोडा
- १/४ चमचे मीठ
- १/४ कप पाणी
- १ कप कोबी
- १ कप बारीक चिरलेला स्प्रिंग अनियन (हिरवा कांदा)
- १ कप बारीक चिरलेले गाजर
- ४ लसूण पाकळ्या
- १ टीस्पून सोया सॉस
- मैदा-पाणीची पेस्ट
- १/२ चमचा मीठ
- तेल
- स्प्रिंग रोल शीट्स बनवण्यासाठी सर्व साहित्य मिक्स करा.
- या मिश्रणापासून स्प्रिंग रोल शीट्स बनवा.
- आता फिलिंग तयार करण्यासाठी एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा घालून मंद आचेवर कांदा मऊ होईपर्यंत भाजा.
- नंतर उरलेल्या सर्व भाज्या, साहित्य टाका आणि मोठ्या आचेवर शिजवा.
- नंतर एक शीट घ्या आणि त्याच्या काठावर मैद्यात पाणी मिक्स करून तयार केलेली पेस्ट लावा.
- आता त्यात तयार केलेले फिलिंग भरा.
- त्यानंतर शीट शेवटपर्यंत फोल्ड करा.
- याच्या कडांना मैद्याची पेस्ट लावून चांगले बंद करा.
- हे नीट सील करणे महत्वाचे आहे. जेणेकरून तळताना ते तेलात फुटणार नाही.
- सर्व रोल तयार झाल्यावर तळून घ्या. एकदा हलके तळून घ्या आणि नंतर पुन्हा तळून घ्या.
- तुमचे टेस्टी स्प्रिंग रोल तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.